कारिवडे गावचे सागर गोसावी यांचा प्रयत्न: बबन साळगावकर यांच्या उपस्थितीत पोस्टरचे अनावरण..
⚡सावंतवाडी ता.०८-: कारिवडे गोसावी वाडी येथील सागर गोसावी दिग्दर्शित सात भागाची “संभ्रम” हा मराठी वेब सिरीज दहा एप्रिल रोजी प्रसारीत होणार आहे. त्याच्या पोस्टरचे अनावरण आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
गरीब आणि ग्रामीण तरुणाच्या जीवनावर आधारित बनवण्यात आलेल्या या वेब सिरीमध्ये प्रेम प्रकरणातून मित्रांमध्ये कशी संभ्रमावस्था निर्माण होते यासंदर्भात या गोड वातावरण यामध्ये निर्माण करण्यात आले आहे असे वेब सिरिजचे निर्माता आनंद मेस्त्री आणि दिग्दर्शक सागर गोसावी यांनी या वेब सिरीज बद्दल सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
ते म्हणाले, सावंतवाडी आणि परिसरात या वेब सिरीजचे शूटिंग झाले आहे. चार साडेचार लाख रुपये खर्च करुन हा प्रयत्न करण्यात आला आहे. या वेब सिरीज मध्ये स्थानिक कलाकारांनी काम केले आहे. या वेब सिरीज मध्ये सुरुवातीच्या भागापासून निर्माण झालेला गुंता संभ्रम शेवटच्या भागांमध्ये उघड होतो त्यामुळे सर्वच्या सर्व भाग निश्चितच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.आम्ही या क्षेत्रात नवीन आहोत परंतु नव्याने काहीतरी करण्याच्या उमेदीने आणि या भागातील निसर्ग आणि कलाकार जगासमोर यावेत यादृष्टीने काम करत आहोत आम्हाला अजून मोठा टप्पा गाठायचा आहे ही प्राथमिक सुरुवात आहे भविष्यात यापेक्षा अधिक चांगले करू असे स्पष्ट केले यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर माजी नगरसेविका अफरोज राजगुरू सुरेश भोगटे रवी जाधव कलाकार गायत्री रामशिंदे,राम निपाणीकर, सुहास रुके आदी उपस्थित होते.
