बांदा/प्रतिनिधी
प. पू. श्री नवनीतानंद महाराज (मोडक महाराज) स्थापित श्री स्वामी समर्थ मठ डोंगरपाल येथे बुधवार दिनांक १० रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
सकाळी १० ते ११ स्वामी पादुकांवर अभिषेक, दुपारी १२ ते १२.४५ पर्यंत आरती, दुपारी १२.४५ ते १.३० पर्यंत होम हवन, दुपारी १.३० ते ४ पर्यंत भंडारा/महाप्रसाद, संध्याकाळी ४ ते ७ पर्यंत भजन, ७ ते ८ या वेळेत हरिपाठ, रात्री ८ ते ८.४५ पर्यंत आरती, ८.४५ ते १० पर्यंत पालखी प्रदक्षिणा कार्यक्रम होणार आहे. या सर्व धार्मिक सोहळ्याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डोंगरपाल स्वामी समर्थ मठात १० रोजी धार्मिक उत्सव…
