राजा गावकर:पक्षादेश महत्त्वाचा; त्यामुळे पक्ष आणि महायुती देईल त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम करणार..
⚡मालवण ता.०८-: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार हा शिवसेनेचा असावा आणि त्यात करून किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांनाच उमेदवारी मिळावी असे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची ईच्छा असल्याचे मत शिवसेना शिंदे गटाचे मालवण तालुकाप्रमुख श्री राजा गावकर यांनी व्यक्त केले आहे
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा अद्याप उमेदवार ठरलेला नाही या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख श्री राजा गावकर आणि कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख बबन शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार हा शिवसेनेचा उमेदवार असावा असे म्हणणे आहे पपरंतु शेवटी पक्षादेश महत्त्वाचा त्यामुळे पक्ष आणि महायुती देईल त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम करून त्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले
ते पुढे म्हणाले लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निमित्ताने रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचाच उमेदवार असावा अशी आशा बाळगून त्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य देऊन प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी सज्ज राहण्याचे सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहनही केले. मालवण तालुक्यातील सर्व गावांत संबंधित बुथ प्रमुखांना भेटून योग्य ते मार्गदर्शन केले व मालवण तालुक्यातील एकूण सहा जिल्हा परिषद मतदार संघ तसेच मालवण शहर पैकी एकूण १२३ बूथ वरती बैठका घेऊन संबंधित बूथ प्रमुख व शिवदूत यांना लोकसभा निवडणुकी संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करून महायुती देईल त्या उमेदवाराला मालवण तालुक्यातून ८० टक्के मतदान मिळवून देणार असा निर्धार मालवण शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावकर, तालुकाप्रमुख महेश राणे, विधानसभा मतदारसंघ प्रमुख बबन शिंदे यांनी व्यक्त केला,
यावेळी महेश राणे यांनी एकदा प्रचार यंत्रणा चालू झाली की पुन्हा एकदा गावोगावी आणि प्रत्येक बूथ वरील वाडीवस्त्यांवरती फिरून प्रत्येक घरापर्यंत महायुतीच्या माध्यमातून सरकारने केलेल्या कामांची यादी पोचवुन सरकारने केलेल्या प्रत्येक शासन निर्णयाची माहिती सर्व मतदारांना देऊन प्रचार यंत्रणा राबवली जाईल असे स्पष्ट केले तर
मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघ प्रमुख श्री बबन शिंदे यांनी
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील एकूण 269 बूथ वरती जास्तीत जास्त मताधिक्य देऊन महायुतीच्या संभाव्य उमेदवाराला निवडून आणू तसेच बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर महायुतीच्या माध्यमातून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाला एक सक्षम कार्यसम्राट असा खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहु असे सांगितले
यावेळी मालवण शहर प्रमुख बाळू नाटेकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, उपतालुकाप्रमुख पराग खोत, तालुकाप्रमुख अरुण तोडणकर, उप तालुकाप्रमुख उदय गावडे यांनीही महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले
