Headlines

Global Maharashtra Breaking News

पोलीस पाटील भरती प्रक्रिया राजकिय दबावाखाली केल्यास खपवून घेणार नाही…

सुशांत नाईक:प्रांताधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाखाली न करता गुणवत्तेप्रमाणेच निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करावी.. ⚡कणकवली ता.०५-: पोलीस पाटील भरती प्रक्रिया राजकिय दबावाखाली केल्यास खपवून घेणार नाही असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला आहे. शासनाने कणकवली विधानसभा मतदारसंघात पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबवून उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेतली आहे. या भरती प्रक्रियेत २९ डिसेंबर…

Read More

बांद्यात स्टॉल हटावावेळी पोलिसांकडून युवकाला मारहाण…

ग्रामस्थ आक्रमक; पोलिस ठाण्यात घातला घेराव.. बांदा/सकाळ वृत्तसेवामुंबई-गोवा महामार्गावर बांदा-सटमटवाडी येथे अनधिकृत उभारण्यात आलेले स्टॉल राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात हटविले. यावेळी स्टॉल काढण्यासाठी आडकाठी करणाऱ्या स्थानिक युवकला बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी मारहाण केल्याने ग्रामस्थ आक्रमक झालेत. आपण कोणाच्या आदेशाने मारहाण केलीत असा सवाल उपस्थित करत काल सायंकाळी उशिरा पोलीस ठाण्याला…

Read More

इन्सुली- वेत्ये -निगुडे- सोनूर्ली येथे सुरू असलेल्या काळ्या दगडाच्या खाणीमुळे ग्रामस्थांना त्रास…

गौण खनिज उत्खनन व क्रशर त्वरित बंद करा: अन्यथा आंदोलन: ग्रामस्थांनी दिला प्रांत अधिकाऱ्यांना इशारा.. ⚡बांदा ता.०५-: इन्सुली- वेत्ये -निगुडे- सोनूर्ली येथे सुरू असलेल्या काळ्या दगडाच्या खाणीमुळे इन्सुली कोठावळेबांध ग्रामस्थांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. येथील गौण खनिज उत्खनन व क्रशर त्वरित बंद करावेत तसेच सन 2018, 2019 मध्ये झालेल्या पंचनाम्याप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी अन्यथा…

Read More

मुक्तांगण महिला मंचच्या अध्यक्षपदी माधवी मातोंडकर…

⚡वेंगुर्ला ता.०५-: वेंगुर्ला येथील मुक्तांगण महिला मंचची २०२४-२५ या कालावधीसाठी नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून अध्यक्षपदी माधवी मातोंडकर तर कार्याध्यक्षपदी दिव्या आजगांवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष स्वाती बांदेकर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नुतन अध्यक्ष माधवी मातोंडकर यांच्याकडे सुपूर्द केली.

Read More

साटेली गावातील मायनिंग प्रकल्प त्वरित बंद करा अन्यथा आंदोलन…

ग्रामस्थांनी घेतली प्रांत अधिकाऱ्यांची भेट; मायनिंगमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.. ⚡सावंतवाडी ता.०४५-: येथील साटेली उर्फ सातार्डा गावातील अनधिकृत मायनिंग उत्खनन व मायनिंग साठा वाहतूक बंद करण्यात यावे अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने आज प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे. दरम्यान गावात मायनिंग प्रकल्प आल्याने गावात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे हे मायनिंग त्वरित बंद करण्यात…

Read More

आंबोली माऊली जत्रोत्सव आज मोठ्या उत्साहात…

आंबोली,ता.५: नवसाला पावणारी आणि सर्वांवर मायेचे छत्र ठेवणारी प्रसिद्ध माऊलीचा आज जत्रोत्सव.सह्याद्रीच्या उंच डोंगरात वसलेल्या हिरण्यकेशीच्या उगम स्थानी पुण्यभूमीत वसलेल्या आंबोली माऊलीचा आज जत्रोत्सव.४ हजारच्या वर लोकसंख्या असलेल्या आणि १२ वाडीत पसरलेल्या कोकणातील मुकुटमणी विराजमान असलेल्या आंबोलीचा जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने आज साजरा होत आहे.भाविकांची श्रद्धा असल्याने अनेक भाविक,माहेरवासींनी,ग्रामस्थ याठिकाणी नवस ओठी भरणे आदी कार्यक्रम दिवसभर…

Read More

आंबोलीत शिवसेनेची भव्य क्रिकेट स्पर्धेचं थाटात उद्घाटन…

आंबोली,ता.५: येथे शिवसेना( उद्धव ठाकरे)पुरस्कृत भव्य क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आंबोली कामतवाडी येथे चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी केले. आंबोली शिवसेना (उद्धव ठाकरे) आयोजित क्रिकेट स्पर्धा आजपासून तीन दिवस आयोजित करण्यात आली आहे.स्पर्धेचे उदघाटन शिवसेना समन्वयक चंद्रकांत गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपतालुका संघटक आबा सावंत,शब्बीर मणियार,विभाग अध्यक्ष बबन गावडे, ग्रामपंचायत सदस्य काशीराम राऊत,मायकल डिसोजा,विकास…

Read More

मळगाव येथील देव पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या…

⚡सावंतवाडी : सहदेव राऊळ : मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या शनिवार ६ जानेवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीप्रमाणे दोन पूर्वस हे सोनुर्ली आणि मळगाव या दोन गावचे जागृत देवस्थान आहे. श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाला मळगाव…

Read More

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमच्या आराध्य दैवतावर केलेले भाष्य हे संतापजनक…

संजू शिरोडकर:केवळ आपली वोटबँक सांभाळण्यासाठी चाललेला हा आव्हाडांचा अट्टाहास.. ⚡सावंतवाडी ता.०४-: शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमच्या आराध्य दैवतावर केलेले भाष्य हे अतिशय संतापजनक आहे. वनवासाच्या काळात श्रीरामाने जो आहार घेतला तो फळे आणि कंदमुळे. याचे अनेक दाखले भावार्थ रामायणात आहेत. असे असताना आव्हाडांनी उधळलेली मुक्ताफळे निषेधार्ह आहेत. केवळ आपली वोटबँक सांभाळण्यासाठी व…

Read More

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये मळगाव येथील शारदा विद्यालयाचे घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.०५सहदेव राऊळ-: सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालय या जिल्हा परिषद शाळेच्या मुलांनी घवघवीत यश संपादन केले. यावेळी घेण्यात आलेल्या खो-खो खेळात शाळेच्या मुलांनी प्रथम क्रमांक मिळविला. गुरुवारी पार पडलेल्या या तालुकास्तरीय स्पर्धांना तालुक्यातील शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. केंद्रस्तरीय व प्रभागस्तरीय स्पर्धां पाठोपाठ तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये सुद्धा…

Read More
You cannot copy content of this page