रिव्हॉल्वर, काडतुसांसह एक ताब्यात..

निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर स्टॅटीक सर्वेलन्स टीमला आले यश:नेरूर जकात चेकपोस्टवर तपासणी करीत असताना झाली कारवाई

.ओरोस ता १४
बेकायदेशीर शस्त्र व अवैद्य मद्य बाळगल्या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभाग स्टॅटीक सर्वेलन्स टीम यांनी केली कारवाई करुन ५० हजार किमंतीचे रिव्हॉल्वर, २ काडुतसासह सह एक लाखाचे वाहन व मद्य जप्त करुन आरोपीला ताब्यात घेतले आहे. शनिवारी रात्री साडे बारा वाजता नेरूर जकात चेकपोस्ट येथे ही कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी लोकसभा निवडणुक -2024 शांततेत पार पडावी, निवडणुक पुर्व काळात व निवडणुकी दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांना सिंधुदुर्ग जिल्हयातील अवैध धंदे, शस्त्रे, अंमली पदार्थ व्यवसायात गुंतलेल्या इसमांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हयाचे सिमा भागावर तसेच जिल्हयाच्या चेकपोस्ट असलेल्या ठिकाणी पोलीस विभाग, महसुल विभाग व इतर विभाग मार्फत फरारी पथक व स्टॅटीक सर्व्हेलन्स टिम नेमण्यात आलेले असुन जिल्हयात आचार संहिता सुरु झाल्यापासुन अवैध दारु, अवैध शस्त्रे, अंमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करण्यात आलेली आहे.
आज 14 एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील जकात नाका चेकपोस्ट या ठिकाणी पोलीस विभाग व इतर विभाग यांची संयुक्त कार्यरत असलेली फरारी पथक व स्टॅटीक सर्व्हेलन्स टिम जकात नाका, पोलीस चेक पोस्ट नेरुर येथे वाहनांची चेकींग करीत असतांना आरोपीत ओशन लिया परदेशी, वय-35 वर्षे, रा. म्हापसेकर तिठा, पिंगुळी, ता. कुडाळ यांचे ताब्यातील वाहन क्रमांक MH-07-Q-7300 या वाहनामध्ये 50 हजार रुपये किंमतीचे मेड इन इंग्लंड असे कोरलेले एक रिव्हॉल्वर तसेच 600 रुपये किंमतीची 6 काडतुसे व 4 हजार रुपयाचे अवैध मद्य आढळून आले आहे. त्याबाबत कुडाळ पोलीस ठाणे येथे शस्त्र अधिनियम 1959 कलम 3,25 महाराष्ट्र दारुबंदी अधि. 1949 कलम 65 (अ) 65 (ई) भारतीय दंड सहिंता 1860 चे कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ही कारवाई कुडाळ पोलीस निरीक्षक श्रीमती रुणाल मुल्ला यांचे मार्गदर्शनाशाली भरारी पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री. तडवी पोलीस हवालदार परब, सिंधुदुर्ग खारभुमी विकास वरिष्ठ लिपिक सखाराम परब, सामाजिक वनीकरण मुख्य लेखापाल पंजाबराव राठोड, वाहन चालक लक्ष्मण आडेलकर- वाहन चालक, कॅमेरामन प्रताप धुरी यांनी केलेली आहे. या गुन्हयाचा तपास कुडाळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमसेन गायकवाड हे करीत आहेत.

चौकट
यापुढेही जिल्हयात लोकसभा निवडणुक 2024 शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारु, अंमली पदार्थ, अवैध शस्त्रे, याबाबत कडक कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page