दहशतवादाची सुरुवात जिथून झाली तिथे दोघे एकत्र आले; त्यामुळे केसरकरांचा दहशतवाद आता संपला का…?

मायकल डिसोझा:केसरकरांच्या भुलथापांना राणेंनी बळी पडू नये; चंद्रकांत कासार..

⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडीकरांना नारायण राणे व दीपक केसरकर यांना एकत्र बघून आश्चर्य वाटलं. दहशतवादाची सुरुवात जिथून झाली तिथे दोघे एकत्र आले. त्यामुळे केसरकरांचा दहशतवाद आता संपला का ? हे केसरकरांनी जाहीर करावं असं आव्हान माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांनी दिलं. तर नारायण राणेंना मागचा अनुभव पाहता आता केसरकरांच्या भुलथापांना राणेंनी बळी पडू नये असं मत ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मायकल डिसोझा म्हणाले, सावंतवाडीकरांना नारायण राणे व दीपक केसरकर यांना एकत्र बघून आश्चर्य वाटलं. दहशतवादाची सुरुवात जिथून झाली तिथे दोघे एकत्र आले. त्यामुळे दहशतवाद संपला का ? असा प्रश्न आम्हाला पडू लागला आहे‌. नारायण राणेंबद्दल जे दीपक केसरकर बोललेत ते सर्वश्रुत आहे‌. भविष्यात आपला राजकीय बळी जाऊ शकतो असं केसरकर सांगत होते. दहशतवादाचे हे सोंग केसरकरांनी घेतलं होतं का ? की दहशतवाद संपला हे दीपक केसरकर यांनी जाहीर कराव असं आव्हान माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांनी दिला. परिवाराला धोका आहे असं केसरकर सांगत होते. मग, आता धोका संपला का ते देखील जाहीर करावं अस ते म्हणाले.

दरम्यान, दीपक केसरकर राणेंना मताधिक्य देण्याची भाषा करत आहेत. ते कुठल्या जोरावर हे विधान करत आहेत हा खरा प्रश्न आहे. एका दगडात दोन पक्षी मारण्यात केसरकर माहीर आहेत. राणेंसोबत जमवून घेताना ते हे साध्य करत आहेत. ते एकटे या मतदारसंघात फिरू शकत नसल्याने तापलेल्या तव्यावर आपली भाकरी भाजून घेण्याच काम केसरकर करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या किरण सामंत यांच्या ऐवजी ते राणेंच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. या मतदारसंघात कितीही वल्गना तरी केसरकरांना जनता बळी पडणार नाही. त्यांच सोयीच राजकारण जनतेच्या लक्षात आलं आहे. नारायण राणेंनी देखील मागचा अनुभव पाहता आता केसरकरांच्या भुलथापांना बळी पडू नये असं मत उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार यांनी व्यक्त करत खासदार विनायक राऊत तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यान निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, ठाकरे शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शिवदत्त घोगळे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page