⚡सावंतवाडी ता.१४-: राजा शिवाजी चौक मित्र मंडळ, सावंतवाडीच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती राजा शिवाजी चौक येथे आज साजरी करण्यात आली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे सल्लागार माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, माजी नगरसेवक सुरेश भोगट, बंड्या तोरस्कर, रवी जाधव, दिलीप पवार, आप्पा परब, चिन्मय खानोलकर, डॉन्टस, पटेल, सूर्यकांत सावंत, इफ्तिकार राजगुरू उपस्थित होते.
राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…
