⚡कणकवली ता.१४-: जय हनुमान सामाजिक व सांस्कृतिक मंडळातर्फे कलमठ-मोरेश्वरनगर येथे 22 ते 24 एप्रिल या कालावधीत हनुमान जयंती विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी केली जाणार आहे.
सोमवार 22 रोजी सकाळी 9 वा. जय हनुमान युवा मित्रमंडळाच्या कार्यकारिणीच्या नामफलकाचे अनावरण, 9.30 वा. रक्तदान शिबीर, मंगळवार 23 रोजी पहाटे 5 वा. ह.भ.प. कुणाल गावकर यांचे नारदीय कीर्तन, त्यानंतर हनुमान जन्मोत्सव, 8 वा. अभिषेक, 10 वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी 1 वा. महाप्रसाद, सायंकाळी 7 वा. लिंग-रवळनाथ वारकर सांप्रदाय घोटगे-ढवळवाडी यांचा हरिपाठ, रात्री 8 वा. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, 9 वा. श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ, मळगाव-सावंतवाडी यांचा ट्रिकसीनयुक्त श्री संत सद्गुरु देवावतारी बाळूमामा हा प्रयोग सादर होईल.
बुधवार 24 रोजी रात्री 8 वा. मंडळातर्फे जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेकरिता अनुक्रमे 5,555 रु., 3,333 रु., 2,222 रु. व सन्मानचिन्ह अशी बक्षीसे आहेत. तरी या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
हनुमान जयंतीनिमित्त कलमठमध्ये विविध कार्यक्रम…
