Headlines

Global Maharashtra Breaking News

शाहिर नंदेश उमप यांच्या गायनाने सावंतवाडीकर रसिक तल्लीन..

लोकगीतांचा नजराणा : रसिकांवर गारुड.. ⚡सावंतवाडी ता.०७-: गण, गवळण, गोंधळ, भारुड, बतावणी आणि पोवाडा सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथेचे सादरीकरण या कार्यक्रमांनी सावंतवाडीकर रसिक तल्लीन झाले. निमित्त होते ते शाहीर नंदेश उमप यांच्या ‘महाराष्ट्राची संस्कृती’ या कार्यक्रमाचे.सावंतवाडी येथील स्वार हॉस्पिटल समोरील मैदानावर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग आयोजित…

Read More

सावंतवाडी युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी बासित पडवेकर…

⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी बासित पडवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचे नियुक्तीपत्र आज युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांच्या हस्ते देण्यात आले आहे यावेळी त्यांना उपस्थितांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Read More

१० फेब्रुवारीला सिंधुदुर्गनगरीत व्यावसायिकांना मार्गदर्शन…

एम एस एम एस ई मंत्रालय आणि नॅस्कॉम यांचे आयोजन:केंद्रीयमंत्री नारायण राणे करणार मार्गदर्शन.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-: सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय व नॅस्कॉमच्या सहकार्याने १० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता शरद कृषी भवन ओरस येथे लहान व मध्यम उद्योग व्यवसायिकांसाठी एम.एस.एम.एस.ई सशक्तीकरण रणनीतीक टेक्नोलॉजी च्या मदतीने व्यवसाय वृद्धी, डिजिटल मार्केटिंग, एम.एस.एम.ई. साठी व्यवसाय…

Read More

काजू बी ला प्रती किलो २०० रुपये हमीभाव द्या…

कृषी उत्पन्न समितीची शासनाकडे मागणी. सिंधुदुर्गनगरी ता ७काजू बी ला प्रति किलो २०० रुपये प्रमाणे हमीभाव मिळावा. अशी मागणी शासनाकडे सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आली आहे. कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी २०० रुपये प्रति किलो काजू दरासाठी शासनाकडे मागणी केली आहे व यासाठी आंदोलनही केले आहे. सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात काजू बी उत्पादन…

Read More

शिक्षक भरतीत डीएड बेरोजगारांना न्याय द्या…

राजन तेली: डीएड संघर्ष समितीसह सीईओ देशमुख यांची घेतली भेट. सिंधुदुर्गनगरी ता ७डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या उमेदवारांना अग्रक्रमाने प्राधान्य देऊन शिक्षक पदी नियुक्ती द्याव्यात. या मागणीसाठी आज माजी आमदार राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. सिंधुदुर्ग जिल्हा डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने आज अध्यक्ष विजय…

Read More

नौसेना दिनानिमित्त मालवणात झालेल्या हेलिपॅड व शिवपुतळा सुशोभीकरण कामात मोठा घोटाळा…

परशुराम उपरकर:कामांच्या चौकशीसाठी १५ रोजी आंदोलन.. ⚡मालवण ता.०७-: मालवणात नौसेना दिननिमित्त झालेल्या हेलीपॅड व राजकोट येथील शिवपुतळा सुशोभीकरण कामात मोठा घोटाळा झाला आहे, या कामांची कागदपत्रे व प्रत्यक्ष झालेले काम यात मोठी तफावत आहे, असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत केला. या कामांसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कणकवली कार्यकारी अभियंता श्री….

Read More

बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट सावंतवाडी रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा…

सावंतवाडी : बी.एस.बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट सावंतवाडी कलामहाविद्यालयाचारौप्यमहोत्सवी सांगता समारंभ वेगवेगळ्या उपक्रमाने साजरा करण्याचा मानस आहे.कलाशिक्षणाचा प्रसार आणि उपयोग जिल्ह्यात सर्वदूर पोहोचावा या उद्देशाने महाविद्यालयातर्फ़े दरवर्षी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेचे आयोजन आपापल्या प्रशालेमध्ये करावयाचे ठरवले आहे.ही स्पर्धा व तिचे गटानुसार विषय खालीलप्रमाणे –गट विषयअ) नर्सरी ज्यु ते इयत्ता ४ थी…

Read More

वेंगुर्ले भाजपा महीला मोर्चाच्या वतीने नुतन पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत…

⚡वेंगुर्ले ता.०७-: सर्व जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असलेले पोलिस हे न्यायाचे रक्षक आणि अन्यायाचे भक्षक असतात. सभोवताली पोलिस दिसला की सर्वाना सुरक्षित वाटू लागते. एक पोलिस अधिकाऱ्याचे जीवन अनेक संकटे आणि शौर्याने भरलेले असते. परंतु संकटे आणि जोखमीला न घाबरता ते प्रत्येक परिस्थितीला भीडण्यासाठी तयार असतात. पोलिस निरीक्षक श्री. संदीप भोसले यांची वेंगुर्ला पोलीस ठाण्यात नियुक्ती…

Read More

गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव ‘ आयोजित गांधी विचारधारा परीक्षेत जिल्ह्यातून दर्शना इंदुलकर प्रथम…

⚡मालवण ता.०७-: मालवण तालुक्यातील वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेतील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कुमारी दर्शना दत्ताराम इंदुलकर या विद्यार्थिनीने ‘गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव ‘ आयोजित गांधी विचारधारा परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकावत सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र प्राप्त केले. या परीक्षेत प्रशालेमधून एकूण 55 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. आणि सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम…

Read More

रोणापाल ग्रामस्थांचे ग्रामपंचायत विरोधात उपोषण…

ग्रामस्थांनी वेधले मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे लक्ष : अन्यायाविरुद्ध लढा उभारण्याचा इशारा.. ⚡बांदा ता.०७-: रोणापाल श्री देवी माऊली मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, सार्वजनिक स्वच्छतागृह व्यवस्था करणे, हायमास्ट बसविणे व ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा देणे याविषयीच्या प्रस्तावाबाबत रोणापाल ग्रामपंचायत प्रशासन सहकार्य करत नाही. त्यामुळे येत्या 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा. रोणापाल ग्रामपंचायत कार्यालय…

Read More
You cannot copy content of this page