मालवणात करियर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न…

⚡मालवण ता.१७-: मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे १० वी, ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत विविध क्षेत्रातील करियर संधी, आवश्यक अभ्यासक्रम, कौशल्य विकास याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेस मालवणमधील टोपीवाला हायस्कूल, जय गणेश इंग्लिश माध्यम हायस्कूल, भंडारी हायस्कूल, स. का. पाटील महाविद्यालयाबरोबरच कट्टा, चौके, मसुरे, आचरा, नांदोस अशा विविध ठिकाणच्या ७५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. तसेच अनेक पालकही यावेळी उपस्थित होते.

माजी विद्यार्थिनी उमा आजगावकर यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. या कार्यशाळेत माजी विद्यार्थी व भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे निवृत्त वरिष्ठ डीजीएम संजय सावंत यांनी संरक्षण विभागातील नोकरी व व्यावसायविषयक संधी यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर माजी विद्यार्थी व टेक्नोसिस मॅनेजिंग डायरेक्टर उमेश धारगळकर यांनी बांधकाम क्षेत्रातील संधींविषयी मार्गदर्शन केले. या दोघांनीही लक्षवेधक प्रेझेंटेशनद्वारे ‘विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले. या करिअर मार्गदर्शन कार्यशाळेसाठी टोपीवाला हायस्कुलच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी सहाय्य केले.

You cannot copy content of this page