Headlines

परमेश्वराच्या दर्शनाने आत्मिक समाधान आणि उर्जा…

विशाल परब:रेडी गावातील विविध मंदिरांना भेटी देत तेथील देवदेवतांचे दर्शन घेतले…

⚡वेंगुर्ला ता.१७-: भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी रेडी गावातील विविध मंदिरांना भेटी देत तेथील देवदेवतांचे दर्शन घेतले. यावेळी प्रत्येक ठिकाणी मानकरी व ग्रामस्थंनी त्यांचे स्वागत केले.

  युवा नेते आणि युवकांचे प्रेरणास्थान विशाल परब यांनी रेडी गावाची ग्रामदेवी श्री माऊली व म्हारतळेवाडी येथील श्री देव ब्राह्मण बांदवा मंदिर यांना भेट देत देवतांच्या चरणी नतमस्तक झाले. सर्वांना सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभावे यासाठी प्रार्थना केली. ज्या ज्या वेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेटी घेतो तसेच इतर विकासकामाच्या अनुषंगाने ज्या ठिकाणी जातो तेथील ग्रामदेवतांचे श्रद्धेने मी दर्शन घेत असतो. त्यांच्या दर्शनाने मिळणारे आत्मिक समाधान आणि ऊर्जा मला अधिक जोमाने काम करण्यास बळ देते, असे यावेळी विशाल परब यांनी सांगितले.
You cannot copy content of this page