देवबाग येथील पंढरीनाथ मंदिराचा २० रोजी वर्धापन दिन…

⚡मालवण ता.१७-:
देवबाग येथील श्री देव पंढरीनाथ मंदिराचा २८ वा वर्धापन दिन सोहळा दि. २० मे रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त पंढरीनाथ मंदिरात दि. १९ मे रोजी सायंकाळी ७ ते १० वा. सुश्राव्य भजने, २० मे रोजी पहाटे ४ वा. काकड आरती, सकाळी ७ ते १० वा. देवपूजा व लघुरुद्र, सकाळी १० वा. आरती, सकाळी १०. ३० वा देवदर्शन, दुपारी १२ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. श्रींची पालखी मिरवणूक व खास आकर्षक विविध देखावे, दि. २१ रोजी रात्री ९.३० वा. स्थानिक मुलांचे रेकॉर्ड डान्स, २२ मे रोजी श्री पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ, वेंगुर्ला यांचा ‘श्रीमंतीनी’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. २३ मे रोजी रात्री ९.३० वा. श्री महापुरुष कलावैभव पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, देवबाग यांचा ‘पृथ्वीकंकण’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री पंढरीनाथ ग्रामस्थ मंडळ, देवाबाग मोबार यांनी केले आहे.

You cannot copy content of this page