हरकुळ बु. मधील नुकसानग्रस्तांना आमदार नीतेश राणेंकडून मदत…

⚡कणकवली ता.१७-: कणकवली तालुक्यात गुरुवारी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा हरकुळ बु. गावातील शेख व खडकवाडीतील घरांना बसला होता. या नुकसानग्रस्तांना आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून कौले व पत्रे उपलब्ध करून देण्यात आले.


माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी उपसभापती बुलंद पटेल, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या उपस्थितीत नुकसानग्रस्तांना पत्रे व कौलांचे वाटप करण्यात आले. सरफराज शेख, बशीर शेख, सईश शेख, नुरमहंम्मद शेख, आबीदाबा शेख, सफराज शेख, सलाम शेख, हुसेनबी शेख, निमायत पटेल यांना पत्रे तर बाबू पटेल, चाॅद पटेल, नयफ पटेल, राफार पटेल, अायुब पटेल, रमिज पटेल, हमिर पटेल, सुलतान पटेल, सईद नाईक, अब्बास शेख, इमरान शेख, गुलाब शेख, अब्दूल शेख, शोयब पटेल, नासीर पटेल, सरफराज शेख, शनिफ शेख, मोहसीन शेख, मुकसाना नाईक, शाहरूख शेख यांना कौले देण्यात आली. हरकुळ बु.मधील शेख व खडकवाडीतील घरांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. याबाबत माहिती आमदार नीतेश राणे यांना दिल्यानंतर त्यांनी आम्हाला तात्काळ मदत करण्याची सूचना केली. आमदार नीतेश राणे यांनी नुकसानग्रस्तांना तातडीची मदत म्हणून कौले व पत्रे उपलब्ध करून दिले आहेत. त्याचे वाटप आम्ही नुकसानग्रस्तांना केले आहे, असे संदेश सावंत यांनी सांगितले. या मदतीबद्दल आमदार नीतेश राणे यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page