Headlines

Global Maharashtra Breaking News

कुडाळ मालवण मतदार संघासाठी भरीव निधी मिळावा…

अर्थसंकल्पात तरतूद करा:निलेश राणे यांची मागणी.. ओरोस ता.१९-: येत्या काही दिवसात पावसाळी अधिवेशन जाहीर होणार असून या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल. लोकसभा निवडणुकीनंतर व विधानसभा निवडणुकीच्या आधी अर्थसंकल्प सादर होत असल्याने सर्व राज्याच लक्ष या अर्थसंकल्पाकडे आहे. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी या अर्थसंकल्पातुन भरीव निधी मिळावा अशी मागणी भाजपा कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक प्रमुख…

Read Full News

अरुण धुरी कुंटूबाकडून शैक्षणिक साहीत्य वाटप…

बांदा/प्रतिनिधीजिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा शेर्ले नंबर १ येथे शेर्ले गावातील दानशूर व्यक्ती अरुण धुरी आणि सौ. लक्ष्मी धुरी कुटुंबीय गेली आठ वर्षे सातत्याने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना अरुण धुरी यांनी सर्व पालकांच्या उपस्थितीत पहिली ते पाचवीच्या एकूण ७२ विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल, कंपास पेटी अशा…

Read Full News

मसुरे भरतगड किल्ला येथे २० जुन ला कार्यक्रम…

⚡मालवण ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे भरतगड किला येथे रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद या नवीन संस्थेच्या स्थापना कार्यक्रमाचे आयोजन २० जून रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत करण्यात आल्याची माहिती या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीकांत सावंत यांनी दिली रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही संस्था स्थापन…

Read Full News

आदर्श सेवाकार्यातुन नावलौकिक प्राप्त करा…

गटशिक्षणाधिकारी संजय माने यांचे प्रतिपादन.. ⚡मालवण ता.१९-: शिक्षकी पेशाला समाजात फार मोठे स्थान आहे. शिक्षण व संस्कारातून विद्यार्थी घडवत असताना शिक्षकांनी आदर्श सेवाकार्यातुन नावलौकिक प्राप्त करावा. असे प्रतिपादन मालवणचे गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी केले शासनाच्या शिक्षक भरतीतून मालवण तालुक्यातील नवनियुक्त 88 शिक्षकांचे स्वागत तसेच मार्गदर्शन कार्यशाळा मालवण पंचायत समिती शिक्षण विभाग रघुनाथ देसाई सभागृह येथे…

Read Full News

कुडाळ मध्ये १४ जुलै रोजी मॉन्सून मॅरेथॉनचे आयोजन…

आरोग्य आणि पर्यटन यांची सांगड ; कोकणातील पहिली स्पर्धा :राणे हॉस्पिटल आणि टीम कुडाळ मॉन्सून रन यांचे आयोजन.. ⚡कुडाळ ता.१९-: Every running step makes your heart stronger, अशी टॅग लाईन घेऊन येत्या 14 जुलैला कुडाळ मध्ये हाफ मॅरेथॉन स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. राणे हॉस्पिटल, मेडिकल रिसर्च सेंटर आणि टीम कुडाळ मॉन्सून रन 2024 यांच्या…

Read Full News

नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सर्व समाजघटकांचा सहभाग महत्त्वाचा…

प्रभारी कुलगुरू डॉ. अजय भामरे:मालवणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न.. ⚡मालवण ता.१९-: शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, भारतीय ज्ञान परंपरा, कौशल्य, संस्कृती व इतिहास यांचे ज्ञान अवगत व्हावे या दृष्टीने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले आहे. या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी साठी मुंबई विद्यापीठाकडून पथके तयार करून…

Read Full News

मालवणात २३ रोजी समाज संवाद साहित्य संमेलन…

⚡मालवण ता.१९-:बॅ. नाथ पै सेवांगण मालवण आणि समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्यावतीने बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे दि. २३ जून रोजी समाज संवाद साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी समीक्षक प्रा. रणधीर शिंदे असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. दत्ता घोलप उपस्थित राहणार आहेत. सकाळी १० वाजता प्रा. संजीवनी पाटील, मधुकर…

Read Full News

सद्गुरु राऊळ महाराज श्री क्षेत्र पिंगुळी येथे 101 गरीब क्षयरुग्णांना धान्य वाटप…

⚡कुडाळ ता.१९-: श्री सद्गुरू राऊळ महाराज श्री क्षेत्र पिंगुळी येथे निक्षय मित्र संकल्पने अंतर्गत श्री सुवर्णाजी गोपाळ आमोणकर परिवार,श्री सद्गुरु राऊळ महाराज संस्थान, श्री प.पू. विनायक अण्णा राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने निक्षय मित्र कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील 101 गरीब , गरजू व निराधार क्षयरुग्णांना मोफत सहा महिने धान्य वाटप करण्यात आले….

Read Full News

इन्सुली मारहाण प्रकरणी नऊ जणांना जामीन मंजूर…

⚡सावंतवाडी ता.१९-: आर्थिक फसवणुक झाल्याच्या रागातून इन्सुलिन जंगलात नेऊन तिघांना बेदाम मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नऊ जणांना आज पोलीस कस्टडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केली आहे. याकामी अँड अनिल निरवडेकर , अँड राघवेंद्र नार्वेकर, अँड प्रवीण काळसेकर यांनी काम पाहिले.

Read Full News

मातोंड शासकीय वनात भेरलेमाडाची पानं तोडणाऱ्या आरोपींना दोन दिवसांची वनकोठडी…

⚡वेंगुर्ला ता.१९-: मातोंड येथील शासकीय वनात भेरलेमाडाच्या पानांची तोड करून तस्करी केल्याप्रकरणी सावंतवाडी वनविभागाच्या फिरते पथकाने तळवडे येथील बाबल लाडू परब, वय-49 वर्षे व प्रकाश लाडू जाधव, वय-55 वर्षे, दोघेही राहणार मौजे-तळवडे यांना काल अटक केली होती. सदर आरोपींची चौकशी केली असता भेरलेमाडाच्या पानांची तोड ही मुंबई-पुणे येथे विक्रीच्या उद्देशाने पाठवण्यासाठी केली असल्याचे सदर आरोपींनी…

Read Full News

You cannot copy content of this page