मसुरे भरतगड किल्ला येथे २० जुन ला कार्यक्रम…

⚡मालवण ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे भरतगड किला येथे रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद या नवीन संस्थेच्या स्थापना कार्यक्रमाचे आयोजन २० जून रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत करण्यात आल्याची माहिती या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीकांत सावंत यांनी दिली

रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही संस्था स्थापन करत आहोत. यामध्ये दोन्ही जिल्ह्यातील रहिवासी, जिल्ह्यांबाहेर रहाणारे जिल्ह्यांतील रहिवासी तसेच जे देशभर आहेत व परदेशात आहेत त्यांनी या संस्थेशी जोडले जावे व सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

You cannot copy content of this page