अरुण धुरी कुंटूबाकडून शैक्षणिक साहीत्य वाटप…

बांदा/प्रतिनिधी
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा शेर्ले नंबर १ येथे शेर्ले गावातील दानशूर व्यक्ती अरुण धुरी आणि सौ. लक्ष्मी धुरी कुटुंबीय गेली आठ वर्षे सातत्याने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना अरुण धुरी यांनी सर्व पालकांच्या उपस्थितीत पहिली ते पाचवीच्या एकूण ७२ विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल, कंपास पेटी अशा शालेय उपयोगी वस्तू देऊन शाळेतील मुलांचे स्वागत केले.
याप्रसंगी मुलांनी शिकाव, खूप मोठ व्हाव. आमच्याकडून व आमच्या कुटुंबियाकडून जेवढी काय मदत होईल ती शाळेसाठी आम्ही करण्यासाठी सदैव तत्पर आहोत असे श्री धुरी यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी सौ. लक्ष्मी धुरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल जाधव, उपाध्यक्षा सौ. साईशा पराष्टेकर, मुख्याध्यापक लक्ष्मीकांत कराड, सदस्या सौ. करुणा धुरी, हुसेन शेख, सर्व पालक, विद्यार्थी व सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक बाबाजी झेंडे यांनी केले.
फोटो :-
शेर्ले येथे मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना मान्यवर.

You cannot copy content of this page