आरोग्य आणि पर्यटन यांची सांगड ; कोकणातील पहिली स्पर्धा :राणे हॉस्पिटल आणि टीम कुडाळ मॉन्सून रन यांचे आयोजन..
⚡कुडाळ ता.१९-: Every running step makes your heart stronger, अशी टॅग लाईन घेऊन येत्या 14 जुलैला कुडाळ मध्ये हाफ मॅरेथॉन स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. राणे हॉस्पिटल, मेडिकल रिसर्च सेंटर आणि टीम कुडाळ मॉन्सून रन 2024 यांच्या वतीने कोकणात पहिल्यांदाच अशा या मरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. आज कुडाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत या विषयी माहिती देण्यात आली.
यावेळी राणे हॉस्पटिल आणि मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळचे अध्यक्ष डॉ. जी. टी. राणे, अजित राणे, डॉ. जयेंद्र रावराणे, डॉ. प्रशांत सामंत, रुपेश तेली, गजानन कांदळगावकर, दिनेश आजगावकर, रंजन बोभाटे, शिवप्रसाद राणे, अमित तेंडुलकर, भूषण तेजम उपस्थित होते.
राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर आणि टीम कुडाळ मॉन्सूल रन 2024 तर्फे आयोजित भव्य हाफ मॅरेथॉन ही दिनांक १४ जुलै २०२४ रोजी पहाटे ५.३० वाजता बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था एमआयडीसी कुडाळ येथून सुरु होईल. ५, १०, तसेच २१ किलोमीटरचे टप्पे असून त्यासाठी सिंधुदुर्ग सोबतच मुंबई गोवा कोल्हापूर बेळगाव पुणे रत्नागिरी येथूनही धावपटू सहभागी होणार आहेत. तसेच या हाफ मॅरेथॉनचे यजमानपद भूषवण्यासाठी टीम कुडाळ मान्सून रन 2024 सज्ज असल्याची माहिती टीम कुडाळ मान्सून रन यांनी या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना दोन. जी. टी. राणे म्हणाले, राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळ हे 2022 पासून कार्यरत असून या दोन वर्षात राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर ने मेडिकल क्षेत्रात अत्यंत महत्वाची कामगिरी केली आहे. तसेच आरोग्यासंबंधी जनजागृतीसाठी वेळोवेळी अनेक उपक्रमाचे नियोजन केले आहे. हॉस्पिटल तर्फे रोटरी क्लब कुडाळ च्या सहयोगाने रक्तदान शिबिर, श्रवण दोष चिकित्सा शिबिर, दंतचिकित्सा शिबिर, फिजिओथेरपी शिबिर, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित योग शिबिर, असे बरेच कार्यक्रम राबवले जातात.
आरोग्य साठी चालणे किंवा धावणे हे महत्वाचे आहे. व्यायाम व आरोग्य या बद्दलची जनजागृती व्हावी यासाठी पावसाळी मॅरेथॉन आयोजित केली आहे. राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर सह सिंधुदुर्ग सायक्लीस्ट असोसीएशन, कुडाळ सायकल क्लब, रांगणा रनर्स, रोटरी क्लब ऑफ कुडाळ व डॉक्टर्स डॉक्टर्स फ्रेटर्निटी क्लब, सिंधुदुर्ग यांचे ज्येष्ठ सदस्य टीम मॉन्सून रन या नावाने उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यास सज्ज आहेत.
या मॅरेथॉन साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुभवी धावपटू तसेच इतर जिल्ह्यातील धावपटू सहभागी होणार आहे. Bill Rowan medal पुरस्कार प्राप्त प्रसाद कोरगावकर तसेच comrade marathon bronze medal प्राप्त ओमकार पराडकर याबरोबर रत्नागिरीचे Iron Man डॉक्टर तेजानंद गणपत्ये, मुंबईतील Iron Man अरविंद सावंत या प्रसिद्ध धावपटूंची साथ कुडाळ मान्सून रनची शोभा वाढवेल.
आपले हृदय चालत राहावे यासाठी आपण चालत राहण्याचा मोलाचा संदेश घेऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन सिंधुदुर्गातील पहिल्याच होऊ घातलेल्या पावसाळी मॅरेथॉनचा आनंद लुटावा हेच टीम कुडाळ मान्सून रन चे ध्येय आहे.
ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व सदस्यांना मेडल व डिजिटल सर्टिफिकेट दिली जाणार असून खुल्या गटातून तसेच वयोमनाप्रमाणे आखलेल्या गटांमधून प्रथम दोन धावपटूंना आकर्षक रोख बक्षीसही देण्यात येणार आहेत. सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना टी-शर्ट दिले जातील. २१ किलोमीटर खुल्या गटासाठी पुरुष आणि महिला विजेत्यांना पहिल्या दोन क्रमांकासाठी प्रत्येकी २० हजार आणि १५ हजार. तसेच वयानुसार प्रत्येक गटासाठी पहिल्या डून क्रमांकाना ५ हजार आणि ३ हजार, १० किमी पुरुष आणि महिलासाठी खुला गट रु. १० हजार आणि रु. ७ हजार. तसेच वयानुसासर प्रत्येक गटासाठी रु. २ हजार ५०० आणि रु. २ हजार. ५ किमी साठी मात्र कोणते रोख रकमेचे पारितोषिक नाही.
खुल्या गटात १८ वर्ष वरील कोणताही स्पर्धक २१ किमी साठी आणि १५ वर्षावरील कोणताही स्पर्धक १० किमी साठी पात्र असेल. त्याच बरोबर ४० ते ५० वर्षे, ५१ ते ६० वर्षे आणि ६० वर्षावरील असे गट आहेत.
कुडाळ एमआयडीसी मधून सुरु होणारी ही मॅरेथॉन, नेरूर मार्गे वालावल मंदिर येथून नदीपर्यंत जाईल व तिथून पुन्हा एमआयडीसीमध्ये पोहोचेल. स्पर्धेसाठी रुग्णवाहिका, हायड्रेशन पॉईंट, डॉक्टर्स मदत अशा सर्व सुविधा मिळणार आहेत. सहभागी होण्याकरता दूरध्वनी क्रमांक 09421261212 वर संपर्क साधावा किंवा www.ranehospital.net या संकेतस्थळावरून नाव नोंदणी करावी. असे आवाहन यायला आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
