⚡मालवण ता.१९-:
बॅ. नाथ पै सेवांगण मालवण आणि समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्यावतीने बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे दि. २३ जून रोजी समाज संवाद साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी समीक्षक प्रा. रणधीर शिंदे असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. दत्ता घोलप उपस्थित राहणार आहेत. सकाळी १० वाजता प्रा. संजीवनी पाटील, मधुकर मातोंडकर यांनी संपादित केलेल्या सिंधुदुर्गची नवीन कविता, अजय कांडर व जिजा शिंदे यांनी संपादित केलेल्या ‘सारेच पुरुष नसतात बदनामः चर्चा आणि चिकित्सा’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कार कवी डॉ. अनिल धाकू कांबळी यांना प्रदान करण्यात येणार आहे. दु. १२.३० वाजता अॅड. देवदत्त परुळेकर यांचे ‘सानेगुरुजी समजून घेताना’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी २.३० वाजता खुले कविसंमेलन होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवियत्री अंजली ढमाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दर्शना कोलते उपस्थित राहणार आहेत.
