पालकमंत्री नितेश राणे यांचा विविध विकासकामांचा सखोल आढावा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
सिंधुदुर्गनगरी, दि. १ (जि. मा. का.) : जिल्ह्यातील विकासकामांना अधिक गती देत नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आलेली विविध कामे, राजकोट शिवसृष्टी प्रकल्प आणि देवगड नळपाणी योजनेचा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी स्वतंत्र बैठका घेऊन सविस्तर आढावा घेतला.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची प्रलंबित कामे…
