Global Maharashtra Breaking News

ठाकरे बंधू एकत्र आल्याने सावंतवाडीत सेना मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष

⚡सावंतवाडी ता.०५-: राज्य सरकारचा हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतल्यावर मराठी माणसांचा विजय म्हणून वरळी डोममध्ये आज कार्यक्रम पार पडला. दोन ठाकरे बंधू तब्बल १९ वर्षांनी एकत्र येत दोघांनीही दमदार भाषणे केली. यानंतर सिंधुदुर्गात सावंतवाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके लावून जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी राज आणि उद्धव यांच्या एकत्र…

Read More

उभादांडा येथे ११ हजार रुपयांचा गांजा जप्त…

वेंगुर्ला प्रतिनिधी- उभादांडा-बागायतवाडी येथे वेंगुर्ला पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये येथील प्रसाद प्रकाश तुळसकर (वय ३२) याच्या जवळ सुमारे ११ हजार रुपये किमतीचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ आढळून आला. मुद्देमालासह पोलिसांनी त्याला रात्री ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. फोटोओळी – गांजाप्रकरण प्रसाद तुळकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Read More

शिरोडा वेळागरवाडी येथे घरफोडी…

५ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस.. ⚡वेंगुर्ला ता.०५-: शिरोडा-वेळागरवाडी येथील सुरभी सुरेंद्र कलंगुटकर यांच्या राहत्या घराच्या दर्शनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे ५ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमान अज्ञात चोरट्याने चोरून नेला. या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात अज्ञात…

Read More

“सिंधूदुर्ग कॉलेजच्या अर्थशास्त्र विभागाची जिल्ह्यात बाजी “…

“सिंधुदुर्ग कॉलेजची अर्थशास्त्र विभागाची चैताली कुणवळेकर जिल्ह्यात पहिली आणि लक्ष्मी पारकर दुसरी”.. मालवण दि प्रतिनिधीमालवणच्या स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील तृतीय वर्षी अर्थशास्त्र विषयामध्ये टी वाय बी ए या वर्गात शिक्षण घेत असलेल्या चैताली कुणकवळेकर ही विध्यार्थीनी जिल्ह्यामध्ये ९.५८ ग्रेड घेऊन जिल्ह्यात पहिली तर लक्ष्मी पारकर ही विध्यार्थिनी ९.४३ ग्रेड घेऊन जिल्ह्यात दुसरी आलेली आहे….

Read More

सावंतवाडीच्या रोटरी क्लब अध्यक्षपदी रो.ॲड. सिद्धार्थ भांबूरे यांची निवड

⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडीच्या रोटरी क्लब अध्यक्षपदी रो.ॲड. सिद्धार्थ भांबूरे यांची निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी रो. सिताराम तेली, खजिनदारपदी रो. आनंद रासम यांची निवड करण्यात आली असून ६ जुलै रोजी भगवती हॉल, माजगाव येथे पदग्रहण सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डिजीई रो. डॉ. लेनी डा कोस्टा व एजी रो.सचिन मदने यांच्या…

Read More

करंजे प्राथमिक शाळेत दुमदुमला विठ्ठल नामाचा गजर…

⚡कणकवली ता.०५-: तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजे नंबर १ येथे शनिवारी आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी आणि भक्तीगीत गायनाची स्पर्धा पार पडली. यावेळी पालक, ग्रामस्थ, शिक्षक वृंद, विद्यार्थी, तसेच अंगणवाडी सेविका या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. पारंपारिक कला कौशल्य यांची जोपासना आणि वारकरी दिंडीचे महत्व या विषयी शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल गोसावी यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर…

Read More

बाल शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दुमदुमला “ज्ञानोबा माऊली तुकाराम”चा जयघोष…

कणकवली : येथील बाल शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शनिवारी आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. मुलांनी वारकरी संप्रदायातील पोशाखात सहभागी होत वारीचे वातावरण निर्माण केले. शाळेत सुंदर पालखी सजवण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग व अभंगाच्या गजरात पालखीची मिरवणूक काढली. “ज्ञानोबा माऊली तुकाराम” चा जयघोष करत…

Read More

कणकवली कृष्णनगरी येथे गाभाऱ्यातील मूर्तीच केली लंपास

शनिवारी मध्यरात्रीची घटना ; पोलीस घटनास्थळी दाखल;चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.. कणकवली : तालुक्यातील जानवली कृष्णनगरी या ठिकाणी असलेल्या स्वयंभू दत्त मंदिरातील धातूची मूर्ती शनिवारी मध्यरात्री १२:४५ वा. च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली उघडकीस आली आहे. दरम्यान स्वयंभू दत्त मंदिराचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने मंदिराच्या गाभाऱ्यातील मूर्ती लंपास केली. मूर्ती लंपास करत…

Read More

बांदा केंद्र शाळेच्या चिमुकल्यांची वारकरी दिंडी ठरली लक्षवेधी…

⚡बांदा ता.०५-: बांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्र शाळेच्यावतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत बांदा केंद्रशाळा ते विठ्ठल मंदिरापर्यंत आयोजित केलेली वारकरी दिंडी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध वेशभूषेमुळे लक्षवेधी ठरली. विद्यार्थ्यांच्या या वारकरी दिंडी मुळे बांदा शहरात विठ्ठलमय वातावरण निर्माण झाले.

Read More

आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना वाढीवर भर द्या…

मंत्री नितेश राणेंचे आवाहन: भाजप कार्यालयाला दिली भेट, महेश सारंग यांच्याकडून स्वागत.. ⚡सावंतवाडी ता.०५-: भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरात व ग्रामीण भागात संघटना वाढीवर भर द्यावा, असे आवाहन राज्याचे मत्स्य व बंदर मंत्री नितेश राणे यांनी आज येथे केले. सावंतवाडी येथील शहर भाजप कार्यालयात मंत्री राणे यांनी आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

Read More
You cannot copy content of this page