पाच पुस्कारांनी सन्मानित : जिल्हास्तरावर चार तर विभाग स्तरावरही चमकदार कामगिरी..
⚡देवगड ता.२९-: शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित देवगड तालुक्यातील पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयाने करियर कट्टा अंतर्गत राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्पर्धा २०२५-२६ मध्ये महाविद्यालयाने जिल्हास्तरावर प्रथम तर मुंबई विभागात द्वितीय क्रमांक पटकावून शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असणऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेत्या राज्यस्तरीत महाविद्यालयीन स्पर्धा २०२५-२६ मध्ये शिरगांवच्या पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयाने जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून प्रथम तर मुंबई विभागात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. उत्कृष्ट प्राचार्य म्हणून प्राचार्य समीर तारी, उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक म्हणून प्राध्यापिका अक्षता मोंडकर यांना प्रथम क्रमांक, तसेच महाविद्यालयाच्या करियर संसदेला उत्कृष्ट करियर संसद म्हणून प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले आहे.
महाविद्यालयाने मिळवलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल प्रजासत्ताकदिनी संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी साटम, गणपत तावडे, सरचिटणीस रघुनाथ चव्हाण, महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ. राजेंद्र चव्हाण, शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शाळा समिती अध्यक्ष विजयकुमार कदम, मानद अधिक्षक संदीप साटम, सदस्य दिनेश साटम, मुख्याध्यापक शमशुद्दीन आत्तार, पर्यवेक्षक उदयसिंग रावराणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याबद्दल संस्थाध्यक्ष अरुण कर्ले सर्व संस्थाधिकारी व संचालक यांनी अभिनंदन केले.
फोटो कॅप्शनः
करिअर कट्टा स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळाल्याबद्दल प्राचार्य समीर तारी यांचे संस्थेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
