Headlines

Global Maharashtra Breaking News

रेडी येथील स्टॉलला आग 27 हजार रुपयांचे नुकसान…

⚡वेंगुर्ले ता.०४-: रेडी माऊली मंदिर जवळ प्लॅस्टिक ताडपत्रीने साकारलेल्या देवीचे ओटीसाठी सामान विक्रीचा स्टॉलला अचानक आग लागून सुमारे २७ हजार रूपयांचे नुकसातन झाले. या प्रकरणी स्टॉलचे मालक रेडी नागोळेवाडी येथील श्रावण दाजी सुर्याजी यांनी वेंगुर्लेत पोलीसांत दिलेल्या तक्रारीनुसार जळीत म्हणून नोंद झाली आहे. रेडी नागोळेवाडी येथील श्रावण दाजी सुर्याजी यांचे माऊली मंदिर नजीकच्या स्टॉलला दि….

Read More

वळीवंडेत अग्नीतांडव आंबा व काजू कलमे होरपळली…

सकाळी घडली घटना: सुमारे १५ लाखपर्यत बागेतदारांचे नुकसान.. ⚡देवगड ता.०४-: वळीवंडे येथील कलम बागांमध्ये शनिवारी सकाळच्या सुमारास लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात हापूस आंबा व काजू कलमे आहेत ही आग रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या कलम बागायतीमध्ये पसरत आरे फाटा नजीकच्या भागांमधून तोरसोळे गावाच्या सीमेपर्यंत गेली होती. वातावरणातील उष्मा व वाऱ्यामुळे ही आग पसरत गेली. आग आटोक्यात…

Read More

चुनवरे येथील होम मिनिस्टर कार्यक्रमात सौ. साची तळेकर प्रथम…

देवगडच्या महिलांनी समई नृत्य सादर करून मिळविली वाहव्वा.. ⚡मालवण ता.०४-:चुनवरे येथील श्री देव जैन रामेश्वर मंदिर जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने गेले पाच दिवस आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविकांनी अलोट गर्दी केली. यानिमित्ताने सादर करण्यात आलेल्या समई नृत्य कार्यक्रमाला तसेच दशावतार आणि भजनबारी यांना रसिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवीत दाद दिली. तर महिला…

Read More

कणकवली शहरात रॅलीद्वारे महायुतीचे शक्तीप्रदर्शन…

⚡कणकवली ता.०४-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ महायुतीतील घटक पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातून रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. या रॅलीत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अबीद नाईक, जिल्हा बँकेच्या संचालिका प्रज्ञा ढवण, संचालक विठ्ठल देसाई, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सावळाराम अणावकर,…

Read More

चित्रकार विनायक गोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांमधील कला फुलू लागेल…

बी. जी. गिरकर:चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न.. ⚡मालवण ता.०४-: विनायक गोडकर यांनी चित्रकला ही कला जोपासण्यासाठी घेतलेला ध्यास कौतुकास्पद आहे. मालवणातील मुलांना चित्रप्रेमी बनविण्याचे त्यांचे ध्येय असून मालवणात गोडकर्स आर्ट अकॅडमी सुरु करून हे ध्येय पूर्ण करण्याची सुरुवात गोडकर यांनी केली आहे. विनायक गोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांमधील कला फुलू लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ कलाशिक्षक बी….

Read More

मतदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने नारायण राणे यांच्याकडून धनशक्तीचा वापर…

हरी खोबरेकर यांची टीका:राणे कुटुंबियांना ठाकरे कुटुंबियांवर टीका करण्यासाठीच भाजपमध्ये घेतले. ⚡मालवण ता.०४-:केंद्रीयमंत्री पदाच्या कालावधीत नारायण राणे एकही विकासकाम मालवणात करू शकले नाही, हे त्यांचे अपयश आहे. सकाळी उठावे आणि मातोश्रीवर टीका करावी, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करावी हाच राणे आणि त्यांच्या कुटुंबियांचा विकासाचा कार्यक्रम आहे. राणे यांच्याकडून जनतेला विकासाची अपेक्षा होती, मात्र जनतेला उपेक्षित…

Read More

वाफोली नळपाणी योजनेच्या विहिरी नजिक गटारात औषधाच्या कचऱ्याचा साठा…

बांदा/प्रतिनिधीबांदा-वाफोली रस्त्यावर वाफोली नळपाणी योजनेच्या विहिरीजवळील रस्त्यालगतच्या गटारात तारीख होऊन गेलेल्या औषधच्या कचऱ्याचा साठा उघड्यावर टाकण्यात आल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट लावावी तसेच कचरा टाकणाऱ्याला सक्त ताकीद द्यावी अशी मागणी वाफोलीचे सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांनी केली आहे.काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने तारीख बाह्य औषधे (गोळ्या, इंजेक्शन, बाटल्या) उघड्यावर फेकून…

Read More

राज ठाकरेंच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन…

बांद्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून जंगी स्वागत: राजन तेली,अनिल केसरकर, श्वेता कोरगावकर, गुणाजी गावडे, यांच्यासह अनेकांनी केले जंगी स्वागत.. ⚡बांदा ता.०४-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले असून बांदा येथे त्यांचं ढोल ताशांच्या गजरात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. श्री ठाकरे आज महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ…

Read More

अनसुर गावात राजन तेली यांचा राणेंचा घरोघरी प्रचार…

⚡वेंगुर्ला ता.०४-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा अनसुर येथे महायुतीच्या माध्यमातून भाजप नेते राजन तेली यांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे.दरम्यान या या प्रचारात सरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य स्थानिक पदाधिकारी व जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी देखील आपला सहभाग दर्शवत प्रत्येकाचे घरी जाऊन गाठीभेटी…

Read More

कणकवलीत 10 मे पासून फणस प्रक्रिया प्रशिक्षण…

⚡कणकवली ता.०४-: संकल्प प्रतिष्ठानतर्फे 10 ते 12 मे या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत कणकवली येथे प्रात्यक्षिकावर आधारित फणस प्रक्रिया प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षणात तज्ज्ञ प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पल्प, पोळी, हलबा, गरे पावडर, फणस कणी, बिस्किटं, समोसा, भजी, कटलेट, लोणचं, जॅम, स्क्वॅश, सिरप, फणस पुरणपोळी, चॉकलेट, आईस्क्रिम यांच्यासह अन्य…

Read More
You cannot copy content of this page