मालवणातील मोकाट गुरे व कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी कमलाकर खोत यांच १५ रोजी उपोषण…

⚡मालवण ता.३१-:
मालवण शहरात मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या गुरे व कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी मालवण नगरपालिकेचे वेळोवेळी लक्ष वेधून देखील कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता मालवण नगरपालिकेसमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा मालवण धुरीवाडा येथील ज्येष्ठ नागरिक कमलाकर खोत यांनी नगरपालिकेला निवेदनाद्वारे दिला आहे.

मालवण शहरातील मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांची संचाराबाबत ज्येष्ठ नागरिक कमलाकर खोत यांनी गेल्या काही वर्षात अनेकवेळा आवाज उठवत नगरपालिकेकडे उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच अनेकवेळा उपोषणही छेडले. सध्या मालवण शहरात मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार मागणी करूनही याबाबत नगरपालिकेकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने कमलाकर खोत यांनी पुन्हा एकदा दि. १५ ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

You cannot copy content of this page