एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांनी घेतला नाचणी लागवडीचा प्रत्यक्ष अनुभव…
⚡वैभववाडी ता.०५-: शासनाच्या एक दिवस बळीराजासाठी बांधावरची शाळा या अभिनव उपक्रमांतर्गत विद्या मंदिर मांगवली नं 1 येथील विद्यार्थ्यांनी दिलीप राणे यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष नाचणी लागवडकरून शेतीचा अनोखा अनुभव घेतला.शेतभेटीदरम्यान दिलीप राणे यांनी विद्यार्थ्यांना शेतीतील विविध अवजारे, पिकांची लागवड, शेतीची कामे तसेच कृषीविषयक विविध बाबींची माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून आपल्या ज्ञानात सखोल भर…
