Headlines

एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांनी घेतला नाचणी लागवडीचा प्रत्यक्ष अनुभव…

⚡वैभववाडी ता.०५-: शासनाच्या एक दिवस बळीराजासाठी बांधावरची शाळा या अभिनव उपक्रमांतर्गत विद्या मंदिर मांगवली नं 1 येथील विद्यार्थ्यांनी दिलीप राणे यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष नाचणी लागवडकरून शेतीचा अनोखा अनुभव घेतला.
शेतभेटीदरम्यान दिलीप राणे यांनी विद्यार्थ्यांना शेतीतील विविध अवजारे, पिकांची लागवड, शेतीची कामे तसेच कृषीविषयक विविध बाबींची माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून आपल्या ज्ञानात सखोल भर घातली व प्रत्यक्ष अनुभवातून शेतीविषयी अधिक माहिती जाणून घेतली.
या उपक्रमास मांगवली गावचे सुपुत्र, राज्यस्तरीय “वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार” प्राप्त प्रगतिशील शेतकरी श्री. महेश रामदास संसारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच या उपक्रमाचे नियोजन व यशस्वी अंमलबजावणी विद्या मंदिर मांगवली नं. १ चे मुख्याध्यापक श्री. राहुल भाऊसाहेब नांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आत्मीयता, श्रमप्रतिष्ठा, कृषीविषयक जागरूकता आणि शेतकऱ्यांविषयी आदरभाव निर्माण झाला. विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले असून, विद्या मंदिर मांगवली नं. १ने राबविलेला हा उपक्रम ग्रामीण शिक्षणासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

You cannot copy content of this page