⚡सावंतवाडी ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक कै.सुर्यकांत बाळकृष्ण पेडणेकर यांच्या स्मरणार्थ मुक्ताई ॲकेडमीतर्फे विदयार्थ्यांसाठी सावंतवाडी शहर मर्यादित कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पाटणकर वाड्यातील ॲकेडमीच्या कॅरम प्रशिक्षण केंद्रात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत विविध शाळेंमधील पहिलीपासून ते दहावीपर्यंतच्या एकाहत्तर मुलांनी व मुलींनी सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यावेळी मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कॅरम प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर सरांनी विदयार्थ्यांना कॅरम खेळाविषयी मार्गदर्शन केले.
विजेत्या स्पर्धकांना ॲकेडमीच्या सरचिटणीस सौ.स्नेहा पेडणेकर आणि राष्ट्रीय बुदधिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर यांनी लवकरच बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. आभार सौ.स्नेहा पेडणेकर यांनी मानले.
पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी, सातवी ते दहावी या तीन गटात स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटात चार आणि मुलींसाठी तीन अशाप्रकारे एकूण एकवीस पारितोषिके देण्यात आली. विजेत्यांना रोख रक्कम, चषक, मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
पारितोषिकप्राप्त विदयार्थी –
गट पहिला – पहिली ते तिसरी – पहिला आदित्य सुर्वे, दूसरा मितांश पेडणेकर, तिसरा हर्षवर्धन गुरव, चौथा शहजान नदाफ
मुली – पहिली चैतन्या दाभोलकर
गट दूसरा – चौथी ते सहावी – पहिला जयेश जाधव, दूसरा रत्नजित मोहिते, तिसरा मोहम्मद फैजान खान, चौथा नुमान नदाफ
मुली – पहिली आर्या शेख
गट तिसरा – सातवी ते दहावी – पहिली आस्था लोंढे, दूसरा चारुदत्त गवंडे, तिसरा स्मित सावंत, चौथा अरमान शेख
मुली – पहिली आरजू शेख, दूसरी ईशानी सावंत
मुक्ताई ॲकेडमी आयोजित कॅरम स्पर्धेत आदित्य, जयेश, आस्था विजयी…
