वृक्षतोड रोखणे काळाची गरज…
डी. पी. तानवडे यांचे प्रतिपादन ः नगरवाचनालय परिसरात वृक्षारोपण… ⚡कणकवली ता.१०-: विकासाच्या नावाखाली शहर व ग्रामीण भागात वृक्षांची वारेमाप तोड होत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. निसर्गाचा समतोल बिघडू नये म्हणून प्रत्येकाने वृक्षतोड थांबवून वृक्षांची लागवड करून त्याचे संवर्धन केले पाहिजे. वृक्षतोड रोखण्यासाठी समाजात जनजागृती करावी, असे आवाहन नगरवाचनालयाचे सहकार्यवाह डी. पी. तानवडे…
