काळसे येथे घराची भिंत कोसळून नुकसान…

⚡मालवण ता.०९-: मालवण शहर तसेच तालुका परिसराला संततधार कोसळणाऱ्या पावसाने झोडपून काढले आहे. काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. काळसे बागवाडी येथे विजय माडये यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे.

तालुक्यात पावसाची संततधार सुरूच आहे. पावसाचा जोर 11 जून पर्यत कमी अधिक प्रमाणात असाच राहील. असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. अशी माहिती मालवण प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

फोटो : काळसे येथे घराची भिंत कोसळून नुकसान झाले.

You cannot copy content of this page