Headlines

Global Maharashtra Breaking News

जनहिताच्या प्रश्नांबाबत आमदार, खासदार यांनी दुर्लक्ष केल्यानेच मालवणातील मताधिक्य घटले…

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर: ठाकरे शिवसेनेला घरचा आहेर .. ⚡मालवण ता.१०-: आमदार वैभव नाईक व माजी खासदार विनायक राऊत यांनी जनहिताच्या प्रश्नांच्या अनुषंगाने मालवण नगरपरिषेच्या प्रशासकीय कारभाराबाबत मवाळ धोरण स्वीकारले. शहरातील प्रश्नांबाबत आमदार, खासदार यांच्याकडे त्यांच्याच पक्षाचा माजी नगरध्यक्ष म्हणून गेली दोन वर्षे सातत्याने आपण भूमिका मांडूनही त्याकडे दुर्लक्ष झाले. यामुळेच लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव…

Read More

दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण…?

अशोक परब:प्रशासन कानाडोळा असल्याचाही केला आरोप.. ⚡बांदा ता.१०-: पाटकर पुलाजवळील रस्ता अत्यंत धोकादायक झाला असून याठिकाणी अपघात होऊन मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उबाठा सेनेचे नेते अशोक परब यांनी उपस्थित केला आहे. पाटकर पुलाजवळ आधीच धोकादायक असलेल्या रस्त्यावर बारीक ग्रीड आणून टाकली आहे. या रस्त्यावरून रात्रंदिवस रहदारी चालू असते. शाळकरी मुले, वृद्ध…

Read More

भालावल गावातील समस्या राणेंच्या माध्यमातून मार्गी लावू…

संजू परब: गावातील विविध विकासाच्या प्रश्नांसंदर्भात पदाधिकाऱ्यांची भेट घेत केली चर्चा.. ⚡सावंतवाडी ता.१०-: येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्री संजू परब यांनी भालावल गावात आज भेट देत अतिवृष्टी व विविध गावाच्या समस्या संदर्भात गावातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. दरम्यान गावातील जे काय समस्या असतील ते आता राणेंच्या माध्यमातून आपण सोडू अशी ग्वाही यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना श्री…

Read More

सिंधुदुर्गातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेत वर्धापन दिन निमित्त दिल्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.१०-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतली.यावेळी त्यांना पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी राज्यमंत्री मा. प्रवीणभाई भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे परब, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मा‌. व्हिक्टर डॉन्टस, उद्योजक मा. संदीप घारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मा. शरदचंद्र पवार…

Read More

कुडाळमधील सांस्कृतिक चळवळीला लागेल ते सहकार्य करणार…

अभिजित पानसे यांची केदार सामंत यांच्याशी चर्चा.. ⚡कुडाळ ता.१०-: सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजित पानसे यांनी आज कुडाळ भेटीदरम्यान कुडाळ मधील रंगकर्मी केदार सामंत यांच्याबरोबर विवीध सांस्कृतिक विषयावर चर्चा करुन लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धिरज परब उपस्थित होते.केदार सामंत यांनी कुडाळ मधील सर्व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती…

Read More

दीपक केसरकर मित्र मंडळाच्या वतीने 13 जून रोजी दहावी -बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव…

⚡सावंतवाडी ता.१०-:सावंतवाडी तालुक्यातील दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यालयातील प्रथम तीन विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान.नाम. दिपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने दि.१३ जून रोजी संध्याकाळी ३ वाजता वैश्य भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येक हायस्कूल मधील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित…

Read More

सर्व्हिस रोड बनला पार्किंग झोन

⚡कणकवली ता.१०-: शहरातील सर्व्हिस रोडवर अनधिकृतपणे वाहने पार्किंग केली जात आहेत. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सदर रोडवर चालक बिनधास्तपणे वाहने पार्क करीत असल्याने हा रोड पार्किंग झोन बनल्याचे चित्र आहे.मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामांतर्गत शहरात उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. कणकवली शहरात ये-जा करण्यासाठी सर्व्हिस रोडचीनिर्मिती करण्यात आली. मात्र, या रोडवर सध्या बिनाधास्तपणे चालक वाहने…

Read More

श्री बांदेश्वराची मिरगाची     पालखी उत्साहात…

⚡बांदा, ता.१०-:बांदा येथील प्रसिद्ध जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वराचा मृगाच्या पालखीचा सोहळा शुक्रवार ७ जुन रोजी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. बांदेश्वर भक्तांच्या गर्दीत वाजत गाजत ही पालखी प्रदक्षिणा पार पडली.या पालखीला वरुण राजाने सरी बरसवून आपली उपस्थिती दर्शवीली.   दरवर्षी श्री बांदेश्वराच्या जत्रोत्सवापासून हा पालखी सोहळा प्रारंभ होतो. त्यानंतर दर सोमवारी मंदिराभोवती…

Read More

मातोंड ग्रामपंचायत आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.१०-: ग्रामपंचायत मातोंड आणि युवा रक्तदाता मित्रमंडळ, मातोंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सावंतवाडी रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने रक्तपेढीने रक्तदान शिबीर आयोजित करण्याची विनंती रक्तमित्र बाबली गवंडे यांना केली होती. त्या पार्श्वभूमीवर केवळ सात-आठ दिवसांतच आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात तब्बल तीस रक्तदात्यांनी रक्तदान करुन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला….

Read More

पाडलोस येथील धोकादायक साईडपट्टीचे काम अपूर्ण…?

अपघाताची शक्यता : अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष; समीर नाईक. ⚡बांदा ता.१०-:पाडलोस मडुरा मार्गावरील पाडलोस येथे रस्त्याचे काम घाईघाईने करण्यात आले. रस्त्याची साईडपट्टी निर्धोक करण्यासाठी दगडही टाकण्यात आले, मात्र सद्यस्थितीत ते दगड धोकादायक ठरत असल्याने साईडपट्टीही धोकादायक बनली आहे. सदर काम तत्काळ करावे, अन्यथा अपघात घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा शिवसेना (ठाकरे गट) मळेवाड युवासेना…

Read More
You cannot copy content of this page