अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी: तहसीलदारांना निवेदन सादर..
⚡सावंतवाडी ता.२९-: मालवण राजकोट येथे घडलेल्या घटनेचा अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग सावंतवाडी तालुका यांच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी संबंधित बांधकाम विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाही देण्यात आल्या. या घटनेचा निषेधार्थ दोषींवर तात्काळ कारवाई करा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अँड.सुहास सावंत यांनी तहसीलदारांकडे निवेदनद्वारे केली.
यावेळी अँड.निंबाळकर,अँड.निता सावंत गावडे, पुंडलिक दळवी, अभिषेक सावंत सर्वेश कोठावळे, उमाकांत वारंग, संजय लाड आदी यावेळी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
