दिलीप भालेकर यांचा वाढदिवस उद्या सामाजिक उपक्रमाने होणार साजरा…

विशाल परब व दिलीप भालेकर मित्र मंडळाचा पुढाकार: भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन..

⚡सावंतवाडी ता.२९-: भाजप जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष दिलीप भालेकर यांचा वाढदिवस उद्या विशाल परब व दिलीप भालेकर मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात येणार आहे. यावेळी येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटत, तसेच सविता आश्रमला धान्य वाटप करत हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

तरी सर्व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उद्या सकाळी 11 वाजता विशाल परब यांच्या कार्यालयाकडे उपस्थित राहावे, असे आवाहन दिलीप भालेकर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page