मालवणात झालेला राडा हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा झालेला अपमान…

जयेंद्र परुळेकर: पालकमंत्री नामनिराळे, मात्र जबाबदारी त्यांचीच,तर केसरकरांच्या वक्तव्यावर व्यक्त केला संताप..

⚡सावंतवाडी ता.२९-: राजकोट मालवण येथे काल जो राडा झाला तो काही वर्षांपूर्वी वेंगुर्ल्यात झालेल्या राड्याची आठवण ताजी करणारा होता.राज्यभरात सुसंस्कृत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा राडा संस्कृतीशी जोडण्याचा हा लांच्छनास्पद प्रकार होता.
हा खरं तर जिल्ह्याचा अपमान आहे.असे मत शिवसेना ठाकरे सेनेचे प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले.दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तर गायबच झालेले आहेत. पुतळ्याची काळजी घेण्याची जबाबदारी खरं तर सार्वजनिक बांधकाम विभागाची होती.पण पुतळा नौदलाने बांधला असं जनतेची दिशाभूल करणारे विधान करून ते नामानिराळे होऊ पाहात आहेत. असा आरोप श्री परुळेकर यांनी यावेळी केला.

ते पुढे म्हणाले की

“घराघरात फिरून रात्री एकेकाला मारून टाकीन”
“पुतळा पडला म्हणून तुमच्या भावना दुखावल्या काय?” अशी मुजोर वक्तव्यं नवनिर्वाचित खासदार माजी मुख्यमंत्री कर असतील तर ते कुठल्या संस्कृतीचे दर्शन आपण महाराष्ट्राला देत आहोत ह्याचे भान देखील राणेंना राहिलेलं दिसत नाही असाही टोला ही त्यांनी यावेळी हाणला.दरम्यान “पुतळा पडला हे शुभसंकेतच आहेत, ह्यातून पुढे चांगलंच घडेल.आता शंभर फूटी पुतळा उभारू ” अशी संतापजनक वल्गना शिक्षणमंत्री करत आहेत. याबद्दल देखील परूळेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

You cannot copy content of this page