Global Maharashtra Breaking News

जागतिक जलदिना निमित्त जलसुरक्षक विक्रांत जोईल यांचा सत्कार…

⚡देवगड ता.२३-: जागतिक जलदिना निमित्त पाणी गुणवत्तेत चांगली कामगिरी केल्याबद्दल कातवण जलसुरक्षक विक्रांत जोईल याचे पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर यांनी शाल व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला .पाणी शुद्धीकरण करणे व पाणी गुणवत्ता चांगली राखण्याची महत्वाची जबाबदारी जलसुरक्षक गावामध्ये पार पाडत असतो . याच अनुषंगाने जागतिक जल दिनानिमित्त दरवर्षी पाणी गुणवत्तेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जलसुरक्षक…

Read More

विठू महाकाली देवीचा पालखी सोहळा २६ मार्च ते ३० मार्च पर्यंत..

⚡वैभववाडी ता.२३-: राजापूर ( रत्नागिरी ) मिळंद येथील  सुमारे २०० वर्षाची परंपरा असलेली रावराणे समाजाची अराध्य देवता विठू महाकाली देवीचा पालखी सोहळा दिनांक २६ मार्च ते ३० मार्च असा पाच दिवस तालुक्यातील रावराणे समाजाच्या बारा इनाम गावात संपन्न होणार आहे. तब्बल बारा वर्षानंतर देवीच्या पालखीचे आगमन होत असून  या सोहळ्यात रावराणे समाजासह गावागावातील अबालवृध्द चाकरमानी,…

Read More

वेत्ये शाखाप्रमुख पदी श्री सुरेश सातार्डेकर…

तर बूथ प्रमुख पदी श्री शशिकांत देवलकर:गितेश राऊत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र.. ⚡सावंतवाडी ता.२३-: वेत्ये शाखाप्रमुख पदी श्री सुरेश अर्जुन सातार्डेकर तर बूथ प्रमुख पदी श्री शशिकांत देविदास देवलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याबातचे नियुक्तीपत्र श्री गितेश राऊत यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख श्री रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार ,श्री रमेश गावकर ,विभाग प्रमुख श्री…

Read More

माजगाव येथे आयटीचा “पायलेट प्रोजेक्ट” होणार सुरू…

अन्नपूर्णा कोरगावकर यांची माहिती: उद्या होणार भव्य शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.२३-: सिंधुदुर्गातील मुलांचं टॅलेंट इकडेच राहावं यासाठी अन्नपूर्णा “टेक सोर्स अँड गो सोर्स च्या” माध्यमातून “आयटी स्टार्टअप” सिंधुदुर्गात प्रथमच सुरू होत आहे. याचे भव्य उद्घाटन उद्या सायंकाळी उद्यनगर येथे होणार आहे याबाबतची माहिती सीओ अन्नपूर्णा कोरगावकर, प्रोप्रायटर ऐश्वर्या कोरगावकर व गो सोर्स सीओ संतोष कानसे यांनी…

Read More

सिंधुदुर्ग १ एप्रिल पासून गाईच्या दुधाचे दर पूर्ववत होणार…

गोकुळ दुध उत्पादक संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे आश्वासन:सतीश सावंत यांची माहिती.. ⚡कणकवली ता.२२-: गायीच्या दुधाचे दर प्रतिलिटर ४ रु कमी करण्यात आल्याने गायीच्या दुधाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे गायी पालन करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून दुधाचे दर पूर्ववत करण्याची मागणी यावेळी चेअरमन अरुण डोंगळे यांच्याकडे करण्यात आली. त्यावर त्यांनी…

Read More

मालवण शहरातील चार मालमत्ता नगरपालिकेकडून सील…

⚡मालवण ता.२२-: मालवण नगरपालिका हद्दीतील नागरिकांना विहित पद्धतीने मालमत्ता मागणी देयके बजावून तसेच वेळोवेळी जाहीर आवाहन करुनही थकित मालमत्ता कर न भरल्याने नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज मालवण शहरातील चार मालमत्ता सील करून २ लाखाच्या थकीत कराच्या मालमत्ता गोठविण्यात आल्या. मालवण नगरपालिकेच्या मालमत्ता वसुली पथकातील महेश परब, सोनाली हळदणकर, सुधाकर पाटकर, श्रध्दा आरेकर, भास्कर राऊळ, बस्त्याव…

Read More

भंडारी हायस्कुलमध्ये वन दिवस साजरा…

⚡मालवण ता.२२-: मालवण येथील भंडारी ए. सो हायस्कूलमध्ये २१ जून हा जागतिक वन दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना वने आणि वन दिवसाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून देण्यात आले. तसेच समाजात वन दिवसाचे महत्व समजण्यासाठी घोषणा देत उस्फूर्तपणे विद्यार्थ्यांची मालवण शहरातून प्रभातफेरी काढण्यात आली. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. हणमंत तिवले उपस्थित होते. तसेच…

Read More

मालवणात २ मेपासून चित्रप्रदर्शन…

⚡मालवण ता.२२-: गोडकर्स आर्ट अॅकॅडमीतर्फे मालवण येथील दैवज्ञ भवन येथे दि. २ ते ५ मे या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात मालवण शहरातील शाळांतून घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धातील विजेत्यांची चित्रे मांडण्यात येणार आहेत. गोडकर्स आर्ट अॅकॅडमीतर्फे मालवण शहरात शालेय व खुल्या गटातून घेण्यात आलेल्या स्पर्धेत ५६० चित्र प्रवेशिका आल्या होत्या….

Read More

वडाचापाट येथील शांतादुर्गा हायस्कुलमध्ये वन दिवस साजरा…

⚡मालवण ता.२२-: वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल या प्रशालेत हरित सेना अंतर्गत ‘जागतिक वन दिवस’ उत्साहात साजरा झाला. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ‘झाड आहे मानवाचा मित्र उगारू नका त्यावर शस्त्र’, ‘Save Tree, Save Earth’ अशा घोषणा देत पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या तुकाराम महाराजांच्या अभंगाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी छत्रपती…

Read More

वाहतूक पोलिसांनी हरवलेल्या अपंग मुलाला केले आईच्या स्वाधीन…

⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी शहरातील परप्रांतीय महिला आपल्या अपंग मुलासहित तेथील एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेली होती. त्यादरम्यान त्यांनी आपल्या मुलाला एटीएम बाहेर ठेवले होते. पैसे काढून त्या बाहेर आल्या असता मुलगा तिथे दिसून आला नाही. त्यामुळे त्यांनी तेथील परिसरात शोधाशोध केली परंतु मुलगा मिळून आला नाही. शोधा शोधा करत असताना त्यांना वाहतूक पोलीस निदर्शनास आले….

Read More
You cannot copy content of this page