मुलांनी करियर मार्गदर्शनात भाग घेऊन आपल्या करिअयरचा उद्देश ठरवावा…

प्रकाश दळवी:होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबई आयोजित विद्यार्थी गौरव सभारंभ व करियर मार्ग दर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न..

⚡वेंगुर्ला ता.१३-: आजच्या विद्यार्थी यांनी केवळ शालेय शिक्षण करून चालणार नाही ही तर स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल तर स्पर्धा परीक्षा ,करियर मार्गदर्शन यात भाग घेऊन आपल्या करिअयरचा उद्देश ठरवावा असे मत होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबई अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी मत व्यक्त केले होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबई आयोजित शालेय विद्यार्थी गौरव सभारंभ व करियर मार्ग दर्शन कार्यक्रम वेळी दळवी बोलत होते .

होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबई मार्फत खास कार्यक्रमाचे आयोजन होडावडे ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आले होते यावेळी गावातील विद्र्यार्थीं पालक वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी या कार्यक्रम व्यासपीठावर गावचे सरपंच सौ रसिक केळुसकर ,होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबई अध्यक्ष प्रकाश दळवी ,उपाध्यक्ष नंदकुमार पार्सेकर , खजिनदार प्रकाश नाईक , माजी अद्यक्ष मोहन नाईक ,ग्रांमपंचायत सदस्य अरविंद नाईक ,माजी उपाध्यक्ष संभाजी होडावडेकर, ग्रामोन्नती मंडळ मुंबई स्थानिक सदस्य हनुमंत सरवणकर ,अरुण मेस्त्री ,रवींद्र केळुसकर ,तसेच स्थानिक प्रतिनिधी रामचंद्र कुडाळकर .उमेश पावणोजी ,दिपक दळवी,हनुमंत सरवणकर , संदेश सावंत , तसेच मंडळाचे माजी पदाधिकारी सदस्य स्थानिक अन्य पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते . या कार्यक्रंम वेळी होडावडे गावातील १ ते ७ वि, व दहावी बारावी ,पदवीधर मुलाचा गुणगौरव करण्यात आला .तसेच या कार्यकर्मप्रसंगी वनखात्यात अधिकारी पदावर नियुक्ती झालेल्या दत्ताराम लाडू दळवी याचा सत्कार करण्यात आला तसेच माजी पदाधिकारी याना सन्मानित करण्यात आले .

या कार्यक्रमवेळीहोडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबई माजी पदाधिकारीमार्फत मंडळ मार्फत खास सत्कार सोहळा आयोजित केला होता. तसेच गाव स्थानिक सदस्य कमिटी पदाधिकारी याच्या मार्फत अध्यक्ष प्रकाश दळवी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश पावणोजी यांनी तर आभार प्रदर्शन हनुमंत सरवणकर यांनी केले.

You cannot copy content of this page