Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत ओझर विद्यामंदिरचे यश..

⚡मालवण ता.०९-:शिरवंडे येथील त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या मालवण तालुकास्तरीय शासकीय शालेय मैदानी स्पर्धेमध्ये कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे. या स्पर्धेत ओझर विद्यामंदिरच्या अमृता गणेश बागवे हिची १४ वर्षे मुलींच्या वयोगटामध्ये १०० मीटर धावणे,उंच उडी व लांब उडी या क्रीडा प्रकारांमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी…

Read Full News

अन्यथा भटक्या कुत्र्यांना मालवण नगरपालिकेत सोडून तीव्र आंदोलन छेडू…

मनसेचा आक्रमक इशारा:नगरपालिकेला निवेदन सादर.. मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढून कुत्र्यांकडून लहान मुले व नागरिकांवर हल्ले होत असून मालवण नगरपालिका प्रशासनकडून कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. कुत्र्यांकडून होणाऱ्या या हल्ल्याना नगरपालिकाच जबाबदार आहे, असा आरोप करत आज मनसेने करत कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यास भटक्या कुत्र्यांना नगरपालिकेत आणून सोडू तसेच तीव्र…

Read Full News

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने पटकाविले कबड्डीतील अजिंक्यपद…!

⚡मालवण ता.०९-:रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे मुंबई विद्यापीठा मार्फत आयोजित झोन क्रमांक चार च्या आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यात मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाच्या विद्यार्थिनींनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला संघाला पराभूत करून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये प्रथमच महिला कबड्डी संघाने झोन क्रमांक चार अंतर्गत अजिंक्यपद पटकाविले आहे. या स्पर्धेत…

Read Full News

पडेल प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्या…

स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी:गेले पंचवीस वर्ष प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी प्रलंबित.. ⚡देवगड ता.०९-: पडेल प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळवावा, ही मागणी २५ वर्षांपासून प्रलंबित आहे. पडेल सरपंच भुषण पोकळे यांच्या नेतृत्वाखाली आज पडेल दशक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी पंचायत सभापती व उपसभापती यांनी आमदार नितेशजी राणे यांना निवेदन दिले. या निवेदनात पडेल प्राथमिक…

Read Full News

मोटर सायकलची पादचाऱ्याला धडक ; पादचारी गंभीर जखमी

दुचाकी स्वारावर गुन्हा दाखल जामसंडे दीर्बादेवी स्टॉप येथील घटना.. देवगड ता.०९-: जामसंडे दीर्बादेवी टॉप नजीक घाडी कोल्ड्रिंक समोर रस्त्याने घरी पायी चालत जात असताना मोटर सायकलची धडक बसल्याने पादचारी किशोर बबन मोरे (३६) राहणार जामसंडे शांतीनगर हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात ४ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास देवगड नांदगाव मार्गावर दीर्बादेवी स्टॉप…

Read Full News

देवगड बंदर येथे मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूची विक्री…

पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष उद्योगपती नंदकुमार घाटे, मच्छिमार संस्थांचे प्रतिनिधी व मच्छि मारांनी पोलिस प्रशासनाला धरले धारेवर. ⚡देवगड ता.०९-:गोवा बनावटीच्या दारूचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट असून देवगड बंदर परिसरात ही दारू मोठ्या प्रमाणात खुलेआमपणे विक्री केली जात आहे.जेटी भागात स्टॉलवर खुलेआमपणे विक्री होत असतानाही पोलिस त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत उलट हेच दारूव्यावसायिक पोलिस…

Read Full News

संविता आश्रमाच्या प्रशस्त हॉलचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन…!

कुडाळ : जीवन आनंद संस्थेच्या माध्यमातून पणदूर कार्यरत असलेल्या संविता आश्रममध्ये बांधण्यात आलेल्या प्रशस्त हॉलचे उदघाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. यासाठी आमदार वैभव नाईक यांनी २५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला होता.गेली अनेक वर्षे जीवन आनंद संस्थेच्या माध्यमातून निराधार बांधवांना पणदूर येथील संविता आश्रमात उत्तम प्रकारे सेवा देण्यात येत आहे. या…

Read Full News

कुडाळ मध्ये २७ ला मालवणी वक्तृत्व स्पर्धा…

आकार स्टुडिओच्या वतीने आयोजन.. कुडाळ : आकार स्टुडिओच्या वतीने महाविद्यालयीन आणि खुल्या गटासाठी दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० मालवणी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ येथील चिं त्र्यं खानोलकर ललित कला केंद्र (कुडाळ हायस्कुलनजीक) येथे ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी भरघोस रकमेची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.या स्पर्धेच्या निमित्ताने आकार स्टुडिओने सिंधुदुर्गची ओळख…

Read Full News

सावंतवाडी मतदारसंघाचा विकासात आंबोली, चौकुळ व गेळे ही प्रमुख केंद्रस्थानी असतील…

मंत्री दिपक केसरकर:वन खात्याचे ३५ सेक्शन तिन्ही गावच्या सातबारांवर रहाणार नाही.. ⚡सावंतवाडी ता.०९-: कबुलायतदार गांवकर जमीन प्रश्नाचा हा लढा गेली अनेक वर्षे सुरू होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंबोली, चौकुळ, गेळे वाटपाच्या जीआरवर सही केली. मात्र, नंतरच्या ठाकरे सरकारने याला स्थगिती देण्याच काम केलं. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिलं कोणतं काम केलं तर…

Read Full News

गेळे येथील कबुलायतदार गांवकर जमीन प्रश्न खऱ्या अर्थाने आज सुटला…

मंत्री रवींद्र चव्हाण:गावासाठी झटणारे संदीप गावडेंसारखे कार्यकर्ते तयार व्हावेत.. ⚡सावंतवाडी ता.०९-: वर्षानुवर्षे ज्या प्रश्नासंदर्भात आपण सर्वजण झटत होतो व संघर्ष करीत होतो तो गेळे येथील कबुलायतदार गांवकर जमीन प्रश्न खऱ्या अर्थाने आज सुटला आहे. २५ वर्षानंतर हा सुवर्ण दिवस आपण पाहतो आहे तो फक्त आणि फक्त महायुतीच्या सरकारमुळेच. त्यामुळे आपले आशीर्वाद हे सदैव महायुतीच्या पाठीशी…

Read Full News

You cannot copy content of this page