आकार स्टुडिओच्या वतीने आयोजन..
कुडाळ : आकार स्टुडिओच्या वतीने महाविद्यालयीन आणि खुल्या गटासाठी दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० मालवणी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ येथील चिं त्र्यं खानोलकर ललित कला केंद्र (कुडाळ हायस्कुलनजीक) येथे ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी भरघोस रकमेची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या स्पर्धेच्या निमित्ताने आकार स्टुडिओने सिंधुदुर्गची ओळख असलेल्या मालवणी भाषेतून विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली असून सर्वानी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाविद्यालयीन गटासाठी ‘कोकणच्या विकासाचा इमानउडता हा…, ‘आपली भाषा, लाजा व्हया कित्या?’, ‘स्त्री पुरुष समानता? वास्तव’, हे विषय आहेत. तर खुल्या गटासाठी ‘उद्याचं कोकण’, मी परंपरा नाकारतोय कि स्वीकारतोय ?’, ‘ट्रोलिंग, एक नवीन दुखणं’, या विषयावर स्पर्धा घेतली घेतली जाणार आहे.
महाविद्यालयीन गटातील विजेत्याला ५००१/-, द्वितीय ३००१/-, तृतीय क्रमांकाला २००१/-रुपये व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ दोन क्रमांक देण्यात येणार असून प्रथम १००१/-आणि द्वितीय क्रमांकाला ५०१/- रुपये व प्रमाणपत्र दिले जाईल. खुल्या गटातील विजेत्याला ७००१/-, द्वितीय ५००/१/-, तृतीय ३००१/-आणि सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, शिवाय उत्तेजनार्थ प्रथम १००१/-आणि द्वितीय क्रमांकाला ५०१/- रुपये व प्रमाणपत्र दिले दिले जाणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र ही दिले जाणार आहे.
१७ ते २५ वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येणार असून स्पर्धेला येताना सोबत महाविद्यालयाचे ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे. खुल्या गटातून २१ ते ६० वर्षे वयोगटातील नागरिकांना स्पर्धेत सहभागी होता येणार असून स्पर्धेला येताना आधार कार्ड सोबत आणणे बंधनकारक आहे. सादरीकरणाची वेळ आठ मिनिटांची असून स्पर्धकांनी विषयाचे सादरीकरण मालवणी भाषेत करणे बंधनकारक आहे. स्पर्धेचा प्रवेश नि:शुल्क असून २० ऑक्टोबर पर्यंत नाव नोंदणी करावी. नाव नोंदणीसाठी 7588451473 या क्रमांकावर व्हाट्सअप द्वारे संपर्क साधावा, असे आवाहन आकार स्टुडिओ तर्फ करण्यात आले आहे.
