सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने पटकाविले कबड्डीतील अजिंक्यपद…!

⚡मालवण ता.०९-:
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे मुंबई विद्यापीठा मार्फत आयोजित झोन क्रमांक चार च्या आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यात मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाच्या विद्यार्थिनींनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला संघाला पराभूत करून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये प्रथमच महिला कबड्डी संघाने झोन क्रमांक चार अंतर्गत अजिंक्यपद पटकाविले आहे.

या स्पर्धेत सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने पहिल्या सामन्यात श्रीवर्धन संघाचा, दुसऱ्या सामन्यात वैभववाडी कॉलेजचा आणि अंतिम सामन्यात गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरीचा पराभव केला. या संघात तृप्ती तळवडेकर, निकिता देसाई, निर्जरा कांबळी, सानिया अटक, रेशमा पांढरे, पूजा पांढरे, विनीता साठे,रिद्धी हडकर, ममता धुरी,भार्वि शिर्सेकर, क्षितिजा खरवते, साक्षी केळुसकर व छाया यमकर यांचा समावेश होता. या संघाला प्रशिक्षक श्री. हरिश्चंद्र साळुंखे यांचे गेली तीन वर्षे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. त्यांना जिमखाना प्रमुख डॉ. हंबीरराव चौगुले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ए. ठाकूर, संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पंतवालावलकर, संस्थेचे सचिव श्री. चंद्रशेखर कुशे तसेच इतरांचे सहकार्य लाभले.

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या झांट्ये सभागृहामध्ये या विजेत्या संघाचा चषक देऊन प्राचार्य डॉ. एस ए ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिमखाना प्रमुख डॉ. हंबीरराव चौगले,डॉ.सुमेधा नाईक, डॉ.उज्वला सामंत, डॉ. डी.व्ही. हारगीले, डॉ.एम.आर.खोत, प्रा.एस.पी.खोबरे यांसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page