मोटर सायकलची पादचाऱ्याला धडक ; पादचारी गंभीर जखमी

दुचाकी स्वारावर गुन्हा दाखल जामसंडे दीर्बादेवी स्टॉप येथील घटना..

देवगड ता.०९-:

जामसंडे दीर्बादेवी टॉप नजीक घाडी कोल्ड्रिंक समोर रस्त्याने घरी पायी चालत जात असताना मोटर सायकलची धडक बसल्याने पादचारी किशोर बबन मोरे (३६) राहणार जामसंडे शांतीनगर हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात ४ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास देवगड नांदगाव मार्गावर दीर्बादेवी स्टॉप नजीक घडला. या अपघात प्रकरणी मोटरसायकल स्वार महेश कृष्णा लब्दे वय ३९ राहणार जामसंडे पाटकरवाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गंभीर जखमी असलेले किशोर मोरे यांना पुढील उपचारासाठी गोवा बांबुळी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामसंडे शांतीनगर येथील रहिवासी किशोर बबन मोरे हे दिनांक ४ ऑक्टोंबर रोजी सकाळी देवगड येथे कामानिमित्त आले होते .काम आटपून ते घरी जात असताना सकाळी ८:३० च्या सुमारास जामसंडे दीर्बादेवी स्टॉप नजीक असलेल्या घाडी कोल्ड्रिंक जवळ पाटकर वाडी येथून जामसंडे येथे वेगाने येणाऱ्या मोटरसायकलची धडक त्यांना बसल्याने अपघात झाला. या अपघातात किशोर मोरे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी गोवा बांबुळी येथे त्यांना हलविण्यात आले आहे. या अपघात प्रकरणी त्यांची पत्नी सौ सीमा किशोर मोरे यांनी देवगड पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून देवगड पोलिसांनी भरगाव वेगाने हयगळीने बेदरकारपणे मोटरसायकल चालवून किशोर मोरे यांना धडक देत त्यांच्या गंभीर दुखापती मोटर सायकलस्वार महेश कृष्णा लब्दे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतच्या अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल उदय शिरगावकर करत आहेत.

You cannot copy content of this page