देवगड बंदर येथे मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूची विक्री…

पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष उद्योगपती नंदकुमार घाटे, मच्छिमार संस्थांचे प्रतिनिधी व मच्छि मारांनी पोलिस प्रशासनाला धरले धारेवर.

⚡देवगड ता.०९-:
गोवा बनावटीच्या दारूचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट असून देवगड बंदर परिसरात ही दारू मोठ्या प्रमाणात खुलेआमपणे विक्री केली जात आहे.जेटी भागात स्टॉलवर खुलेआमपणे विक्री होत असतानाही पोलिस त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत उलट हेच दारूव्यावसायिक पोलिस हप्ते घेत असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत ही बाब गंभीर असून गोवा बनावटीची दारू प्राशन केल्यामुळे पाच वर्षात अनेक खलाशी तांडेल यांचा मृत्यु झाला आहे या गंभीर विषयाबाबत पोलिस प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्यास व दारूविक्री करणाèयांवर कारवाई न केल्यास मच्छिमारांसमवेत उपोषणाला बसण्याचा इशारा तसेच यापुढे गोवा बनावटीची दारूमुळे मृत्यु झालेल्या खलाशाचा मृतदेह पोलिस स्टेशनमध्येच आणून ठेवला जाईल असा गंभीर इशारा यावेळी उपस्थित मच्छिमारांनी दिला.

उद्योगपती नंदकुमार घाटे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी देवगडमधील मच्छिमार संस्थांचे प्रतिनिधी व मच्छिमार यांनी देवगड पोलिस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर धडक देवून देवगड मध्ये खुलेआमपणे विक्री करीत असलेल्या गोवा बनावटीच्या दारू प्रश्नाबाबत अधिकारीवर्गाला चांगलेच धारेवर धरले.देवगड बंदर जेटीच्या आजुबाजुच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गोवा बनावट दारूची विक्री केली जात असून देशी दारू व इतर दारूपेक्षा स्वस्त असल्याने ही दारू मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे.ही दारू नौकांवरील तांडेल, खलाशी मोठ्या प्रमाणात पित असल्याने त्यांचा हात,पाय, तोंडाला सुज येणे व किडनीचे विकार होणे असे आजार होत आहेत.या दारूच्या प्राशनाने गेल्या पाच वर्षात अनेक तांडेल व खलाशांचा मृत्यु झाला आहे.त्यामुळे मच्छिमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.ही दारू बेकायदेशीररित्या विकली जात असून या दारू विक्रीवर छापे टाकून बंदी घालण्यात यावी अशी मागणी यावेळी मच्छिमारांनी केली.

देवगड तालुक्यात गोवा बनावटीची दारू गावोगावी बिनधास्तपणे विकली जात आहे हे पोलिस खात्याला व राज्य उत्पादन खात्यालाही माहित आहे.तरीसुध्दा त्यावर कारवाई केली जात नाही.या दारूमुळे अनेकांची कुटूंबे उध्वस्त झाली तरी सुध्दा याची दखल घेतली जात नाही हे दुर्दैव आहे.देवगड बंदरातच पाच स्टॉलवर खुलेआम दारूविक्री होत आहे तरीही पोलिस कोणतीही कारवाई करीत नाही.दारूधंदेवाले बिनदिक्कतपणे पोलिसांना हप्ते देतो असे सांगत असल्याची माहिती उपस्थित मच्छिमारांनी पोलिस निरिक्षक अरूण देवकर यांना दिली .यावेळी नंदकुमार घाटे यांनीही पोलिस अधिकारी यांना या विषयावरून चांगलेच धारेवर धरले.पोलिसांकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही अशा शब्दात पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त केली.गोवा बनावटीची दारूमुळे खलाशाचा मृत्यु झाल्यास त्याचा मृतदेह पोलिस स्टेशनमध्ये आणून ठेवू असा इशारा उपस्थित मच्छिमारांनी यावेळी दिला.

याबाबतचे निवेदन देवगड पोलिस निरिक्षक अरूण देवकर व राज्य उत्पादन शुल्क देवगड कार्यालय पोलिस उपनिरिक्षक एस्.एस्.घावरे यांच्याकडे देण्यात आले.गोवा बनावटीच्या दारू विक्रीप्रकरणी १५ दिवसात ठ ोस कारवाई न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा मच्छिमारांनी दिला.यावेळी उद्योगपती नंदकुमार घाटे, देवदुर्ग मच्छिमार संस्थेचे चेअरमन चंद्रकांत पाळेकर, सचिव कृष्णा परब, तारामुंबरी मच्छिमार संस्थेच्या व्यवस्थापिका सौ.उज्वला तोरसकर, गुरूनाथ वाडेकर, राजा निकम, धनंजय उर्फ बाळा कोयंडे, बाबा आचरेकर, दिनेश गावकर, बंटी वाडेकर, पंढरीनाथ मणचेकर, सुधीर देवगडकर, शरद qशदे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page