Headlines

Global Maharashtra Breaking News

शिवसेना “शिंदे गट” जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांनी घेतली आमदार नितेश राणे यांची भेट…

कणकवलीमहायुतीचे कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे कमळ निशाणी वरील अधिकृत उमेदवार आमदार नितेश राणे यांची शिवसेना (शिंदे गट) जिल्हा संघटक माजी नगराध्यक्ष श्री.महेश कांदळगावकर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन विजयाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी उपजिल्हाप्रमुख श्री.एम.एम.सावंत, महिला जिल्हा प्रमुख श्रीमती सरिता राऊत,युवासेना जिल्हाप्रमुख श्री.मेहुल धुमाळे,उपतालुकाप्रमुख श्री.दामू सावंत,तालुका अध्यक्ष श्रीमती प्रिया टेमकर,शोभा बागवे,आदी उपस्थित होते.महेश कांदळगावकर यांनी नुकताच…

Read Full News

पावसी सरपंच वैशाली पावसकर भाजपात…

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना निवडून आणण्याचा निर्धार:सर्व्हिस रोडचा प्रश्न आठ दिवसांत निकाली लावल्याने घेतला भाजपात जाण्याचा निर्णय.. कुडाळ प्रतिनिधीपावशी गावामध्ये गेली दहा वर्ष महामार्ग लगत सर्विस रस्त्याची मागणी माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्याकडे करून सुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष केला मात्र माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे ही मागणी केल्यावर आठ दिवसात हा…

Read Full News

पणदूर येथील ग्रामस्थांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश….

⚡कुडाळ ता.०८-: पणदूर येथे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पणदूर येथील ग्रामपंचायत सदस्य उल्हास पणदूरकर तसेच कुडाळ नाभिक संघटनेचे भिवा जनार्दन चव्हाण यांच्या सह ग्रामपंचायत पणदूर सदस्य यांनी भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी, सौ. विद्या विद्याधर पणदूरकर, माजी ग्रामपंचायत उपसरपंच पणदूर, सौ भाग्यश्री भिवा चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य, श्री आत्माराम चंद्रकांत पणदूरकर,…

Read Full News

दीपक केसरकरांना टामटून म्हणणारे संजू परब यांची भूमिका अचानक कशी काय बदलली…?

आशिष सुभेदार यांचा सवाल: कोणाला कितीही धमक्या दिल्या तरी जनता तुम्हाला मतपेटीतून उत्तर देणार.. ⚡सावंतवाडी ता.०८-: दीपक केसरकर यांना टामटूम आमदार म्हणणारे संजू परब हे अचानक कसे काय बदलले या मागचे गुपित काय ?असा सवाल ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी आशिष सुभेदार यांनी आज येथे केला. दरम्यान राजन तेली यांना कणकवलीत पाठवण्याची भाषा संजू परब यांनी करू…

Read Full News

अफवांवर विश्वास न ठेवता राजन तेली यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घ्यावी…

प्रथमेश तेली: स्थानिक पातळीवरील उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार कोणीही करू नये.. ⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विरोधकांकडून चुकीची माहिती पसरविली जात आहे. मात्र कोणीही अफवांवर विश्वास न ठेवता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन तेली यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घ्यावी. त्यासाठी निवडणुकीला सामोरे जाताना काहीही कमी पडू देणार नाही आम्ही तुमच्या…

Read Full News

डिकवल येथे शेपटी रोगाने गुरांचा मृत्यू …!

⚡मालवण ता.०८-:मालवण तालुक्यातील डिकवल येथे गेल्या आठ दिवसात शेपटी रोग (बोटूलिझम) या आजाराने गुरांचा मृत्यू झाला आहे. गुरे दगावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. डिकवल तेलीवाडी येथील शेतकरी सुभाष पांडुरंग तेली यांची सुमारे एक लाख रुपये किमतीची गुरे शेपटी रोगाने दगावली. गेल्या आठ दिवसांत या परिसरात शेपटी रोग (बोटूलिझम) या आजाराने येथील गुरांना प्रादुर्भाव झाला…

Read Full News

कुंभारमाठ येथे आम. वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ…!

⚡मालवण ता.०८-; कुंभारमाठ गावचे ग्रामदैवत श्री ब्राम्हण देव तसेच श्री देवी जरीमरी देवी, श्री देव स्वयंभु यांच्या समोर श्रीफळ, प्रचारपत्रक ठेवुन महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वैभव नाईक बहुसंख्य मताधिक्याने निवडून येवोत तसेच महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री व्हावेत असे साकडे कार्यकर्त्यांकडून देवतांच्या चरणी घालण्यात आले….

Read Full News

समोरच्या उमेदवारा जेलमध्ये टाकणे हा सुद्धा केसरकरांचा दहशतवादच…

बबन साळगावकर: कितीही रडीचा डाव खेळलात तरी आता जनता माफ करणार नाही.. ⚡सावंतवाडी ता.०८-: समोरच्या उमेदवारांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणे हा सुद्धा दीपक केसरकर यांचा दहशतवादच आहे. असा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केला. दरम्यान विकास कामांवर न बोलता केसरकर यांचा रडीचा डाव आता सुरू झाला आहे. आजपर्यंत मतदारसंघात केलेल्या घोषणांचे काय…

Read Full News

विशाल परब यांचा जोरदार हटके प्रचार…

फोटो आणि निशाणी ने रंगवली बाईक; मतदारसंघाचे वेधले लक्ष… ⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. कॉर्नरसभा ,प्रभाग सभा व घरोघरी प्रचार केला जात आहे. विशाल परब मात्र अपक्ष असूनही पहिल्या टप्प्यातच घरोघरी पोहोचले आहेत. त्यांची एक वेगळी टीम सोशल मीडियावर सातत्याने हटके प्रचार करीत आहे. सोशल मीडियावरील प्रचार यंत्रणा प्रभावीपणे…

Read Full News

सालईवाडा, शिरोडा नाका परिसरात मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.०८- : महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी गुरुवारी प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर शहरात जोरदार प्रचाराला प्रारंभ झाला. श्री देव मुरलीधर मंदिरात श्रीफळ ठेवून न्यू सालईवाडा, शिरोडा नाका आदि परिसरात घरोघरी जाऊन प्रचार केला. माजी नगराध्यक्ष संजू परब, शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील…

Read Full News

You cannot copy content of this page