बबन साळगावकर: कितीही रडीचा डाव खेळलात तरी आता जनता माफ करणार नाही..
⚡सावंतवाडी ता.०८-: समोरच्या उमेदवारांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणे हा सुद्धा दीपक केसरकर यांचा दहशतवादच आहे. असा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केला. दरम्यान विकास कामांवर न बोलता केसरकर यांचा रडीचा डाव आता सुरू झाला आहे. आजपर्यंत मतदारसंघात केलेल्या घोषणांचे काय झाले असा सवाले माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला असून त्यामुळे आता किती जरी प्रयत्न केला तरी जनता तुम्हाला माफ करणार नाही. असा इशारा श्री साळगावकर यांनी यावेळी दिला आहे.
