कुंभारमाठ येथे आम. वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ…!

⚡मालवण ता.०८-; कुंभारमाठ गावचे ग्रामदैवत श्री ब्राम्हण देव तसेच श्री देवी जरीमरी देवी, श्री देव स्वयंभु यांच्या समोर श्रीफळ, प्रचारपत्रक ठेवुन महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वैभव नाईक बहुसंख्य मताधिक्याने निवडून येवोत तसेच महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री व्हावेत असे साकडे कार्यकर्त्यांकडून देवतांच्या चरणी घालण्यात आले.

यावेळी ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना उपतालुकाप्रमुख राहुल परब, युवतीसेना विभाग प्रमुख सोनाली डिचवलकर, शाखाप्रमुख सदानंद करंगुटकर, युवासेना शाखाप्रमुख जय वस्त, महिला शाखाप्रमुख स्वाती तांडेल, युवती शाखाप्रमुख मुक्ता राजपूत, सुवर्णा भोगावकर ,महादेव हिरणवाळे , तन्मय परब ,पार्थ वस्त , गजानन मांजरेकर, अंकिता पवार आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page