अफवांवर विश्वास न ठेवता राजन तेली यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घ्यावी…

प्रथमेश तेली: स्थानिक पातळीवरील उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार कोणीही करू नये..

⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विरोधकांकडून चुकीची माहिती पसरविली जात आहे. मात्र कोणीही अफवांवर विश्वास न ठेवता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन तेली यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घ्यावी. त्यासाठी निवडणुकीला सामोरे जाताना काहीही कमी पडू देणार नाही आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. महाविकास आघाडीची एकजूट दाखवून देऊया अशी भावनिक साद युवा नेते प्रथमेश तेली यांनी कार्यकर्त्यांना घातली आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे त्यात असे म्हटले आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सावंतवाडी मतदारसंघात विरोधकांकडून आमच्याबद्दल चुकीची माहिती जाणीवपुर्वक पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे.मात्र महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता महाविकास आघाडीचे उमेदवार श्री तेली यांना निवडून आणण्यासाठी काम करूया. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहोत. स्थानिक पातळीवरील उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार कोणीही करू नये. या मतदारसंघात ठाकरे,पवार आणि गांधी हेच उमेदवार आहेत असे समजून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम करावे असे आवाहन त्यांनी केले आहे तर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना विश्वासात घेऊन त्यांचा मानसन्मान केला जाईल. निवडणुकीतील हे युद्ध जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना लागणारे सहकार्य केले जाईल आणि या ठाकरे शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन या निवडणुकीला सामोरे जाऊ अशी हाक मारत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात नक्कीच आपल्याला यश मिळणार आहे असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page