दीपक केसरकरांना टामटून म्हणणारे संजू परब यांची भूमिका अचानक कशी काय बदलली…?

आशिष सुभेदार यांचा सवाल: कोणाला कितीही धमक्या दिल्या तरी जनता तुम्हाला मतपेटीतून उत्तर देणार..

⚡सावंतवाडी ता.०८-: दीपक केसरकर यांना टामटूम आमदार म्हणणारे संजू परब हे अचानक कसे काय बदलले या मागचे गुपित काय ?असा सवाल ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी आशिष सुभेदार यांनी आज येथे केला.

दरम्यान राजन तेली यांना कणकवलीत पाठवण्याची भाषा संजू परब यांनी करू नये. तुम्ही सत्तेत आहात मग ते बॅनर कोणी लावले याचा शोध घ्या. असा सल्ला देखील दिला आहे . यावेळी उगाचच अशा प्रकारच्या धमक्या देऊन सावंतवाडीची कणकवली करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा येणाऱ्या काळात सावंतवाडीतील जनता तुम्हाला माफ करणार नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही आणि केसरकर यांनी भूमिका बदलली असेल पण सावंतवाडी संस्थानचा इतिहास असलेली सावंतवाडीतील जनता सुज्ञ आहे ती योग्य तो निर्णय नक्कीच घेईल, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.

You cannot copy content of this page