Headlines

Global Maharashtra Breaking News

शासकीय मेडिकल कॉलेजचे साहित्य चोरीला…

सहा जणांवर गुन्हे दाखल:सिंधुदुर्गनगरी येथील घटना.. सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामासाठी आणलेले २६ हजार रुपये किमतीचे पत्रे आणि प्लायवूड चोरून नेल्या प्रकरणी कुडाळ तालुक्यातील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सीसीटिव्हीचा आधार घेत या चोरीचा छडा लावला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या कामासाठी साहित्य आणण्यात…

Read Full News

गणरायाला साश्रु नयनांनी निरोप !

⚡कणकवली ता.०२-: येथील सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे उपजिल्हा रुग्णालयासमोर माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय भावपूर्ण वातावरणात श्री गणेशाची पूजन करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी श्री गणेश मूर्तीची ढोल ताशा व फटाक्यांच्या आतिषबाजीत जानवली नदीवरील गणपती साना पर्यंत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. साश्रु नयनांनी गणरायाला…

Read Full News

मालवणात माघी गणेश जयंती निमित्त मालवणच्या भंडारी ए सो हायस्कूल आणि प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले अथर्वशीर्ष पठण…

⚡मालवण ता.०२-:माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल तसेच प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मालवण शहरातील विविध गणेश मंदिरात अथर्वशीर्ष पठण केले भंडारी माघी गणेश जयंती उत्सवाच्या ठिकाणी अथर्वशीर्ष पठण केले. यावेळी उपस्थित गणेश भक्तांनी भंडारी ए सो हायस्कूल तसेच प्राथमिक शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल…

Read Full News

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS – २०२५ परीक्षेला प्रतिसाद…

⚡कणकवली ता.०२-: रविवार २ फेब्रुवारी रोजी आयोजित STS परीक्षेचे उद्घाटन मुख्य परीक्षा केंद्र ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे मध्ये संपन्न झाला. यावेळी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल, गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत, आयडियलच्या मुख्याध्यापिका अर्चना देसाई, शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडीस, संतोष जाधव, विनायक जाधव, आनंद तांबे…

Read Full News

गाळेल येथील तरूणाची आत्महत्या…

⚡बांदा ता.०२-: अक्षय महादेव परब ( 30 )रा गाळेल याने आज रविवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या दरम्यान आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलीमात्र आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. त्याच्या पछयात वडील व भाऊ असा परिवार आहे.

Read Full News

राजकोट किल्ल्यावर सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात…

मेढा राजकोट रहिवाशांची मागणी.. ⚡मालवण ता.०२-:मालवण येथील राजकोट किल्ला पायथ्यालगतची शासकीय जमीन (शेरे जमीन) मध्ये सुशोभीकरण व पर्यटकांसाठी प्रसाधनगृह, बैठक व्यवस्था इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी मेढा राजकोट येथील रहिवाशांनी तहसीलदार वर्षा झालटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राजकोट येथील रहिवाशांनी तहसील कार्यालयात तहसीलदार वर्षा झाल्टे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. राजकोट येथील राजकोट…

Read Full News

व्यापारी हनुमंत पाटकर यांचे निधन…!

⚡मालवण ता.०२-:मालवण बाजारपेठ येथील व्यापारी तथा शालेय पुस्तक भंडारचे मालक हनुमंत श्रीधर पाटकर (वय ७१) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी दुपारी बाजारपेठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे. विराज आणि तेजस यांचे ते वडील, तर मालवणचे माजी नगरसेवक दीपक…

Read Full News

धाडसी कार्याबद्दल मालवणच्या सुकन्या सौ. प्रियांका भोगावकर – पाटील यांचा रेल्वे पोलीस विभागाकडून सन्मान…!

⚡मालवण ता.०२-:धावत्या रेल्वेतून ६ महिन्याच्या मुलासह फलाटावर उडी मारणाऱ्या महिलेला वाचविणाऱ्या मालवण कुंभारमाठच्या सुकन्या आणि दादर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या शिपाई सौ. प्रियांका अविनाश पाटील (पूर्वाश्रमीच्या प्रियांका विनोद भोगावकर) यांचा मुंबईचे रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सौ. प्रियांका पाटील या दि.१७ मार्च २०२४ रोजी दादर रेल्वे स्टेशनवर पोलीस कर्तव्य बजावत…

Read Full News

चिपळूण सावर्डेच्या कॉलेज ऑफ फार्मसी च्या १९८९ – ९० सालच्या माजी विद्यार्थ्यांचा १२ वा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…

⚡मालवण ता.०२-:चिपळूण सावर्डे येथील कॉलेज ऑफ फार्मसी च्या १९८९ – ९० सालच्या माजी विद्यार्थ्यांचा १२ वा स्नेहमेळावा महाबळेश्वर रेंगडी येथील रिजेंटा ग्रीन लिफ रिसॉर्ट येथे मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमानी साजरा झाला. गेली बारा वर्षे दरवर्षी सातत्याने एकत्र येणारे हे मित्र मैत्रिणी पुन्हा एकदा जुन्या आठवणीत रमून गेले. मैत्रीचे बंध वृद्धिंगत करतानाच या मित्रपरिवाराकडून सामाजिक…

Read Full News

आर्थिकदृष्ट्या सक्षम करून मच्छिमारांच्या आयुष्यात परिवर्तन आणणार…

मत्स्यव्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे:पूर्व विदर्भातील मच्छिमार समस्यांबाबत आढावा बैठक.. ⚡कणकवली ता.०२-: खा-या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारी व्यवसाय हा पूर्णत: वेगळा आहे. विदर्भात गोड्या पाण्यावर आधारीत मासेमारी व्यवसाय होत असून येथील मच्छिमारांच्या समस्यांची आपण गांभिर्याने दखल घेतली आहे. या खात्याचा मंत्री म्हणून येथील मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व त्यांच्या आयुष्यात आमुलाग्र परिवर्तन आणणे,…

Read Full News

You cannot copy content of this page