व्यापारी हनुमंत पाटकर यांचे निधन…!

⚡मालवण ता.०२-:
मालवण बाजारपेठ येथील व्यापारी तथा शालेय पुस्तक भंडारचे मालक हनुमंत श्रीधर पाटकर (वय ७१) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी दुपारी बाजारपेठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे. विराज आणि तेजस यांचे ते वडील, तर मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर व उद्योजक परशुराम पाटकर यांचे ते चुलत भाऊ होत.

You cannot copy content of this page