मालवणात माघी गणेश जयंती निमित्त मालवणच्या भंडारी ए सो हायस्कूल आणि प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले अथर्वशीर्ष पठण…

⚡मालवण ता.०२-:
माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल तसेच प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मालवण शहरातील विविध गणेश मंदिरात अथर्वशीर्ष पठण केले भंडारी माघी गणेश जयंती उत्सवाच्या ठिकाणी अथर्वशीर्ष पठण केले. यावेळी उपस्थित गणेश भक्तांनी भंडारी ए सो हायस्कूल तसेच प्राथमिक शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले

मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल तसेच प्राथमिक शाळेच्यावतीने गेली तेरा वर्षे मालवण शहरातील विविध गणेश मंदिरात माघी गणेश उत्सवाच्यनिमिताने अथर्वशीर्ष पठण उपक्रम राबविला जातो या उपक्रमाद्वारे विद्याधिपती गणेशाची आराधना करणे, विद्यार्थ्यांची अध्ययन गती वाढवणे, वाचन- लेखन- भाषण कौशल्य विकसित करणे, त्याचबरोबर आपल्या संस्कृतीचे जतन करत बालमने सूसंस्कारित करणे व अशाप्रकारे गणरायाची सेवा करणे हा हेतू असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही
मालवण मेढा येथील जय गणेश मंदिर , मालवण आडारी येथील गणेश मंदिर, फोवकांडा पिंपळ, मालवण येथील माघी गणेश मंदिर याठिकाणी अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. या उपक्रमामध्ये इयत्ता दुसरी ते सातवीचे सुमारे ६० विद्यार्थी सहभागी झाले होते.

या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील शिक्षक, पालक, विद्यार्थी व संस्था पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page