Global Maharashtra Breaking News

सिलेंडरचा पुरवठा अत्यल्प ; ग्राहकांना नाहक हेलपाटे मारून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय..

आण्णा कोदे यांनी निवेदनावद्वारे वेधले तहसीलदारांचे लक्ष.. ⚡कणकवली ता.३१-: शहरासहित तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सिलेंडरचा पुरवठा अत्यल्प होत आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांनाही नाहक हेलपाटे मारावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष असून आपण याबाबत तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदारांकडे केली आहे….

Read More

खासगी वाहतूकदार-अधिकारी यांचे साटेलोटे ; एसटी शयनयान गाड्या बंद..

एस.टी. कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप दयानंद नाईक यांचा आरोप:एसटी कामगार सेना भ्रष्टाचाऱ्यांचा पंचनामा करणार.. कुडाळ : एस.टी. महामंडळाची शयनयान बस बंद करण्या मागे खाजगी वाहतूकदार आणि महामंडळ अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंधच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप एसटी कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख अनुप दयानंद नाईक यांनी केला आहे. या बंद केलेल्या शयनयान गाड्या सुरू न झाल्यास एस.टी. कामगार…

Read More

अपघात करून पळून गेलेल्या गाडी आणि चालकाचा कुडाळ पोलिसांकडून कडून छडा…

पिंगुळी-गुढीपुर येथे रिक्षाला दिली होती धडक:महाराष्ट्र शासनाच्या पत्तन विभागाची गाडी.. ⚡कुडाळ ता.३१-: पिंगुळी गुढीपुर येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र 66 च्या सर्विस रोडवर रिक्षास महाराष्ट्र शासन असे लिहिलेल्या महिंद्रा बोलेरो गाडीने पाठीमागून धडक देऊन अपघात करून बोलेरो चालक गाडीसह पळून गेला होता.त्याचा छडा लावण्यात कुडाळ पोलिसांना यश आले आहे. ती गाडी महाराष्ट्र शासनाच्या पत्तन…

Read More

इंदिरा गांधी व्यापारी संकुलनाच्या स्लॅबला गळती…

व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान;संजू परब यांच्या कडून तात्काळ पाहणी;तर पावसाळ्या संपल्या तात्काळ दुरुस्ती करून देतो; मुख्याधिकाऱ्यांच आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.३१-: येथील नगरपालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलनाच्या स्लॅबला गळती लागले आहे. त्यामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी गेलं असून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी भाजपच्या माध्यमातून आक्रमक भूमिका घेत तात्काळ मुख्याधिकाऱ्यांना घटनास्थळी…

Read More

महाविकास आघाडी मध्येही उमेदवारीवरून तिढा…

काँग्रेसचाही उमेदवारी बाबत ठराव; तर समीर समीर वंजारी वर लवकरच कारवाई होणार; महेंद्र सांगेलकर. ⚡सावंतवाडी ता.३१-: सावंतवाडी मतदारसंघात महाविकास आघाडीतून कॉंग्रेसचे विलास गावडे उमेदवार असावेत अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. तसा ठराव सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला कार्यकारिणीत आम्ही घेतला आहे. अशी माहिती तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी आज येथे दिली.दरम्यान समिर वंजारी हे कार्यकारिणीत नाहीत. ते तालुका,…

Read More

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील कॉम्प्युटर विभागाला ‘एक्सलंट’ मानांकन…

⚡सावंतवाडी ता.३१-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा विभागाला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यामार्फत केल्या जाणाऱ्या मूल्यांकनामध्ये एक्सलंट हे सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले आहे. मंडळाशी संलग्न संस्थांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी हे मूल्यांकन करण्यात येते. यामध्ये अध्यापन पद्धत, निकाल ,राबविण्यात येणारे शैक्षणिक व इतर उपक्रम ,इंडस्ट्रियल व्हिजिट, तज्ञांची व्याख्याने, व्यक्तिमत्व उद्योजकता विकास…

Read More

आदेशानंतरही ऑफलाइन धान्य देण्यास टाळाटाळ…

संजू परब यांनी वरिष्ठांचे लक्ष वेधल्यावर धान्य देण्यास करण्यात आली सुरुवात:नागरिकांनी संजू परब यांचे व्यक्त केले आभार.. ⚡सावंतवाडी ता.३१-: ई पॉस मशीनचा सर्वर डाऊन असल्यामुळे राज्यात ऑफलाईन धान्य वितरण करण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र तरी देखील आज खासकीलवाडा येथील रेशन धान्य दुकानांवर धान्य देण्यास नागरिकांना टाळाटाळ करत होते. याबाबत काही नागरिकांनी माजी नगराध्यक्ष…

Read More

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत अपुरे समस्या दूर करा…

संजय गवस: शिवसेनेच्या माध्यमातून वेधले बांधकाम विभागाचे लक्ष.. ⚡दोडामार्ग ता.३०-: तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत होणारे अपुरे रस्ते, गटारे, रस्ता लगत धोकादायक असलेली झाडे यांमुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. या समस्या दुर करण्यात याव्यात यासाठी तालुका प्रमुख संजय गवस, शिवसेना उबाठा च्या वतीने, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी…

Read More

बांदा येथील अनेक भागात गेले काही दिवस पाणीपुरवठा बंद…

ग्रामस्थांनी प्रशासनाला धरले धारेवर: असा प्रकार पुन्हा घडल्यास कायदेशीर कारवाई करू; प्रियंका नाईक.. ⚡बांदा ता.३०-: बांदा शहरातील देऊळवाडी, रामनगर, लकरकोट परिसरात गेले आठ दिवस पाणी पुरवठा करण्यात न आल्याने आज संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात धडक देत सरपंच यांच्यासह ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले. सटमटवाडी ग्रामस्थांनी देवकोंडी येथे पाणी सोडण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याला धमकी दिल्याने पाणी सोडण्यास…

Read More

उरण येथील हत्याकांडाचा मालवणात काँग्रेसकडून निषेध व्यक्त…

⚡मालवण ता.३०-: उरण येथील यशश्री शिंदे या युवतीच्या क्रूर हत्याकांडाचा आज मालवणात राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. मालवण भरड नाका येथे मेणबत्त्या प्रज्वलीत करून यशश्री शिंदे हिला काँग्रेसतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. पीडित शिंदे कुटुंबाला तात्काळ संरक्षण मिळावे तसेच या हत्याकांड प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली….

Read More
You cannot copy content of this page