अणसूर पाल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश…

⚡वेंगुर्ला ता.२५-: वजराट येथील श्री सातेरी वाचनालय व गुरूमाऊली माई मांजरेकर ग्रंथ संग्रहालयाच्यावतीने जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त तालुकास्तरीय हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. यात मोठ्या गटातून अणसूर पाल हायस्कूलच्या तन्वी मेस्त्री हिने प्रथम, सानिया गावडे हिने द्वितीय तर पूर्वा चव्हाण हिने उत्तजनार्थ क्रमांक पटकाविला. या सर्वांना अनुक्रमे ९००, ६००, २००, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच वेंगुर्ला तालुका आरोग्य अधिकारी यांच्यावतीने आयोजित केलेल्या ‘स्पर्श-कुष्ठरोग निर्मूलन‘ मोहिमेंतर्गत तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली. यात अणसूर पाल हायस्कूलच्या श्रीयश मालवणकर याने द्वितीय व सानिया गावडे हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page