⚡वेंगुर्ला ता.२५-: कोचरे श्री सिद्ध महापुरूष मठामध्ये गुरूवार दि.२७ फेब्रुवारी रोजी भंडारा उत्सव साजरा करण्यात येत आहहे. यानिमित्त सकाळपासून देवाचे धार्मिक कार्यक्रम, सायं.७.३० वा. घटस्थापना, ग्रामस्थांची भजने, रात्रौ ९ वा. मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रात्रौ ११ वा. गोसावी बालमित्र नाट्यमंडळ कोचरे यांचे ‘आपली संस्कृती आपली परंपरा‘, रात्रौ १.३० वा. अमृतनाथ सिद्धेश्वर द.ना.मंडळ म्हापण यांचा नाट्यप्रयोग, पहाटे ५.३० वा. प्रसाद वाटण्यात येणार आहे. तरी या भंडारा उत्सवास सर्व भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कोचरा सिद्धमहापुरूष मठामध्ये भंडारा उत्सव…
